\Sनागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार २२४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष १२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी २० हजार ५३४ नागरिकांविरुध्द कारवाई करुन ८६ लाख २६ हजार रुपयांचा चा दंड वसूल केला आहे.
शुक्रवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २६, धरमपेठ झोन अंतर्गत ५९, हनुमाननगर झोन अंतर्गत ४१, धंतोली झोन अंतर्गत ८, नेहरुनगर झोन अंतर्गत १७, गांधीबाग झोन अंतर्गत ९, सतरंजीपुरा झोन अंतर्गत ९, लकडगंज झोन अंतर्गत ७, आशीनगर झोन अंतर्गत २२, मंगळवारी झोन अंतर्गत २० आणि मनपा मुख्यालयात ६ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत १५ हजार ६४ बेजबाबदार नागरिकांकडून ७५ लाख ३२ हजार रुपये वसूल केले आहेत.