शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मिक्स मोडमध्ये होणार हिवाळी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या २०२० सालच्या उन्हाळी परीक्षा कोरोनामुळे प्रचंड लांबल्या. विद्यापीठाकडून आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या २०२० सालच्या उन्हाळी परीक्षा कोरोनामुळे प्रचंड लांबल्या. विद्यापीठाकडून आता हिवाळी परीक्षा घेण्याची तयारी सुरू आहे. अद्यापही कोरोनावर पूर्णतः नियंत्रण आले नसल्याने ऑनलाईन व ऑफलाईन अशा मिक्स मोडमध्ये परीक्षा घेण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी दिली.

कोरोनामुळे शैक्षणिक सत्राला फटका बसला व ऑगस्टमध्ये विषम सत्रांचे वर्ग सुरू झाले. बहुतांश विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला असून विद्यार्थी आता परीक्षेची प्रतीक्षा करत आहेत. यासंदर्भात राज्य शासनाकडून कुठलेही दिशानिर्देश आलेले नसले तरी परीक्षांबाबतचा निर्णय विद्यापीठ पातळीवरच घेण्याची सूचना आली आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठाने हिवाळी परीक्षा घेण्यासंदर्भात पावले उचलली आहेत. मिक्स मोडमध्ये परीक्षा झाली तर त्यामुळे शहरी व ग्रामीण दोन्ही भागांतील विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील. यासंदर्भात विद्वत्त परिषद व परीक्षा मंडळाची मंजुरी घेण्यात येण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणतः काही विषयांच्या परीक्षा या दीड महिन्याहून अधिक काळ चालतात. ही बाब लक्षात घेता शनिवारी व रविवारीदेखील परीक्षा घेण्यात येईल, असे कुलगुरूंनी सांगितले.

बीएडची परीक्षा २२ फेब्रुवारीपासून

दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे बीएड अंतिम वर्षाची परीक्षा स्थगित करण्यात आली होती. त्यातला एक पेपर ऑफलाईन झाला होता. विद्यापीठाने उर्वरित पेपर २२ फेब्रुवारीपासून आयोजित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी सांगितले.