शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मृत पोलिसांचे कुटुंबीय विमा लाभाला मुकणार ?

By admin | Updated: July 16, 2015 03:10 IST

वेतनातून एलआयसी पॉलिसी कपात न करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा जबरदस्त फटका नुकतेच निधन झालेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना बसला आहे.

पोलीस आयुक्तांच्या निर्णयाने चुकला एलआयसीचा हप्ता लोकमत विशेषआनंद डेकाटे नागपूरवेतनातून एलआयसी पॉलिसी कपात न करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा जबरदस्त फटका नुकतेच निधन झालेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना बसला आहे. पोलीस आयुक्तांच्या निर्णयामुळे त्या पोलिसांचे गेल्या महिन्याचा एलआयसीचा हप्ता चुकला. त्यामुळे त्या पोलिसांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना एलआयसीचा लाभ मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक व्यक्ती भविष्यात आपल्याला काही झाले तर आपल्या कुटुंबीयांना कुणापुढे हात पसरावे लागू नये म्हणून एलआयसी काढून ठेवते. आपल्या क्षमतेप्रमाणे प्रत्येकजण एखाद तरी पॉलिसी काढतोच. पोलीसही त्यातून सुटले नाहीत. पोलिसांचा कामाचा व्याप पाहता त्यांच्या एलआयसीच्या हप्त्याची रक्कम त्यांच्या वेतनातूनच कपात केली जात होती. परंतु काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त यादव यांनी एक निर्णय घेत ‘एलआयसी किंवा सोसायटीची देय असलेली रक्कम ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात न करता ती त्यांनी स्वत: भरावी’ असे आदेश जारी केले होते. या निर्णयाला अनेकांनी विरोधही केला होता. या निर्णयाचे दुष्परिणाम आता दिसून येत आहेत. सूरजप्रसाद चौबे आणि संजय बघेल असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सूरजप्रसाद चौबे यांचा गेल्या २ जुलै रोजी मृत्यू झाला. ते मुख्यालयात कार्यरत होते. त्यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या तीन आणि ३ लाख रुपयाची एक अशा एकूण चार पॉलिसी काढल्या होत्या. ९७२२५६४७७,९७२७९०९६, ९७३६८३५३६ आणि ९७३६३६५९७ हा त्यांचा पॉलिसी क्रमांक आहे. त्याचप्रकारे संजय बघेल याचाही गेल्या रविवारी मृत्यू झाला. ते हेड कॉन्स्टेबल होते. यासोबतच ते फुटबॉल रेफरी सुद्धा होते. त्यांनी सुद्धा पॉलिसी काढली होती. ९७२९१६४०४ हा त्यांचा क्रमांक आहे. परंतु जून महिन्याचा हप्ता त्यांना भरता आला नाही. हे सर्व पोलीस आयुक्तांच्या नवीन निर्णयामुळे झाले आहे. त्यामुळे या मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना या एलआयसीचा लाभ मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.