शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

असा होईल दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या पेंचच्या २३०० व्यासाच्या जलवाहिनीवार पाच ठिकाणी सुरू असलेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या पेंचच्या २३०० व्यासाच्या जलवाहिनीवार पाच ठिकाणी सुरू असलेली गळती दुरुस्त करण्यात येणार आहे. यामुळे ६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ६०टक्के शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. ६ जानेवारीला पाणीपुरवठा होणाऱ्या जलकुंभावरून ७ जानेवारीला पाणीपुरवठा होणार नाही, तर ७ जानेवारीला पाणीपुरवठा होणाऱ्या जलकुंभावरून ८ जानेवारीला पाणीपुरवठा होणार नाही. अशाप्रकारे ६ फेब्रुवारीपर्यंत दिवसाआड पाणी मिळणार आहे.

६ जानेवारीला पाणीपुरवठा होणारे जलकुंभ -

लक्ष्मीनगर झोन : खामला, प्रतापनगर, गायत्रीनगर, लक्ष्मीनगर जुनी कमांड एरिया, त्रिमूर्तीनगर, टाकळी सीम, जयताळा जी. एस. आर. कमांड एरिया.

धरमपेठ झोन : दाभा आणि टेकडीवाडी, सेमिनरी हिल्स, रामनगर, जीएसआर आणि फुटाळा लाईन कमांड एरिया.

हनुमाननगर झोन : सीताबर्डी फोर्ट-१ , सीताबर्डी फोर्ट-२, किल्ला महाल.

मंगळवारी झोन : गिट्टीखदान जीएसआर कमांड एरिया.

...

७ जानेवारीला पाणीपुरवठा होणारे जलकुंभ

लक्ष्मीनगर झोन : गव्हर्नर हाऊस बर्डी कमांड एरिया, धंतोली इएसआर कमांड एरिया.

हनुमाननगर झोन : ओमकार नगर नवीन आणि ओमकार नगर एक्सीस्टिंग कमांड एरिया, श्रीनगर जलकुंभ, म्हाळगीनगर कमांड एरस, नलंदा नगर जलकुंभ.

धंतोली : रेशीमबाग , हनुमाननगर, वंजारीनगर जलकुंभ १ व २

सतरंजीपुरा झोन : बोरियापुरा, बोरियापुरा फिडर मेन.

आसीनगर झोन : नारी जलकुंभ, नारा, जलकुंभ, जरीपटका

मंगळवारी झोन : गोरेवाडा प्रपोस्ड (गिट्टीखदान जीएसआरवरून) कमांड एरिया, गव्हर्नर हाऊस राजनगर आणि सदर कमांड एरिया.