शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

अगोदर होणार कुलगुरूंची नियुक्ती?

By admin | Updated: January 14, 2015 00:47 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘सीओई’ (कंट्रोलर आॅफ एक्झामिनेशन) आणि ‘एफओ’ (फायनान्स आॅफिसर) या पदांच्या मुलाखती पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.

‘सीओई’, ‘एफओ’ निवड नंतर होण्याची शक्यता : कायदेशीर सल्ला घेणारनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘सीओई’ (कंट्रोलर आॅफ एक्झामिनेशन) आणि ‘एफओ’ (फायनान्स आॅफिसर) या पदांच्या मुलाखती पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. नियमांची तांत्रिक अडचण लक्षात घेता कुलगुरूपदाची निवड झाल्यानंतरच वरील पदांसाठी मुलाखती घेण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी कार्यव्यस्ततेमुळे कुलगुरूपदाचा प्रभार सोडल्यानंतर डॉ. विनायक देशपांडे यांच्याकडे प्रभारी कुलगुरू म्हणून जबाबदारी देण्यात आली. आता कुलगुरूपदाच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यात नेमके कोण कोण उमेदवार राहणार हे स्पष्ट झाले नसले तरी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी या शर्यतीत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच प्रथम कुलगुरू नंतर ‘सीओई’,‘एफओ’ यांची निवड व्हावी, असा सूर निघत आहे. यासंदर्भात नियम तपासू व कायदेशीर सल्ला घेऊ, असे डॉ.गोमाशे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)