शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

पतीला जगविण्यासाठी पत्नीची धडपड

By admin | Updated: November 5, 2014 00:54 IST

पतीला ‘अ‍ॅनाकिलोजिंग स्पॉन्डेलायटिस’ हा रोग जडल्याचे निदान झाले आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. ऐन उमेदीच्या काळात आयुष्याच्या सोबतीने खाट पकडली. उदरनिर्वाहाचे साधन

१२ वर्षांपासून खाटेवर : शस्त्रक्रियेसाठी हवे मदतीचे बळनागपूर : पतीला ‘अ‍ॅनाकिलोजिंग स्पॉन्डेलायटिस’ हा रोग जडल्याचे निदान झाले आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. ऐन उमेदीच्या काळात आयुष्याच्या सोबतीने खाट पकडली. उदरनिर्वाहाचे साधन असलेले आलू-कांद्याचे दुकान बंद पडले. पतीला पुन्हा उभे करण्यासाठी तिने शेती विकली. उपचार केला, पण आज १२ वर्षे झालीत, पती खाटेवरच आहे. उपचारात हातचेही गेले. आता उपचार नको, मरण दे म्हणून पती विनंती करतो, भांडतो. पण तिला पराभव पत्करायचा नाही. तिला नुकतेच गोल्हर हॉस्पिटलमध्ये लंडनहून डॉ. विजय काणे अशा रुग्णांवर उपचार करतात अशी माहिती मिळाली. तिने नागपूर गाठले. डॉक्टरांनी जॉर्इंट रिप्लेसमेंटची शस्त्रक्रियेसाठी चार लाखांचा खर्च सांगितला. हा खर्च तिच्या आवाक्याबाहेरचा आहे, असे असतानाही हताश झालेल्या पतीला जगविण्याची तिची धडपड सुरू आहे. रा. आकोट तहसील नंदीपेट जिल्हा अकोला येथील रहिवासी शोभा महादेव दिंडोकर असे त्या पत्नीचे नाव. २००२ मध्ये शोभाचे पती महादेव यांच्या अंगावर कांद्याचे पोते पडण्याचे निमित्त झाले आणि तेव्हापासून ते खाटेवरच आहे. पत्नीने त्यांना चांगल्यात चांगला उपचार मिळावा म्हणून शेती विकली. परंतु काहीच फायदा झाला नाही. छोटी मुले, त्यांचे शिक्षण, घर कसे चालावे, हा प्रश्न होता. ती हिंमत हरली नाही. कर्ज काढून दोन म्हशी घेतल्या. दुधाचा व्यवसाय सुरू केला. कोणी सांगेल त्या डॉक्टराकडून उपचार केला. परंतु कुठेच यश आले नाही. आपल्यामुळे घर आर्थिक अडचणीत आल्याचे दु:ख पतीला पहावले जात नाही. उपचार नको, मरण दे म्हणून पत्नीला विनंती करतात. यावरून अनेकवळा भांडणही झाले. नुकतेच कुणीतरी शोभा यांना नागपूरच्या गोल्हर हॉस्पिटलमध्ये वर्षातून दोन वेळा लंडनवरून डॉ. विजय काणे येतात व अशा रुग्णांवर मोफत उपचार करीत असल्याची माहिती दिली.तिने नातेवाईकांकडून उसने पैसे घेतले आणि सोमवारी गोल्हर हॉस्पिटल गाठले. डॉ. अनिल गोल्हर यांनी पतीला तपासल्यावर चार शस्त्रक्रिया सांगितल्या. या शस्त्रक्रियेनंतर महादेव पुन्हा आपल्या पायावर उभे राहून चालू-फिरू शकतील अशी शाश्वतीही दिली. शोभा यांची आशा वाढली आहे. परंतु दारिद्र्यासमोर एवढा खर्च शक्य नसल्याने ती संकटात सापडली आहे. तिचा हा शेवटचा प्रयत्न आहे. या प्रयत्नाला समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास महादेव पुन्हा स्वत:च्या पायावर उभे राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) मदतीचे आवाहनआर्थिक स्थितीमुळे असहाय बनलेल्या शोभा यांचे पती महादेववर शस्त्रक्रियेसाठी मदतीची गरज आहे. हीच मदत तिला पुन्हा एकदा लढण्याचे बळ -जगण्याची उभारी देऊ शकते. मदत करू इच्छिणाऱ्या दात्यांनी रामदासपेठ येथील गोल्हर स्पाईन केअर अ‍ॅण्ड ट्रामा रिसर्च इन्स्टिट्यूट येथे किंवा या हॉस्पिटलच्या सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या खाते क्रमांक ३१२०६३९४७१ यावर धनादेश अथवा धनाकर्ष पाठवावेत, असे आवाहन शोभा दिंडोकार (९९२११३७१७३) यांनी केले आहे.