शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून, पतीचा जामीन फेटाळला

By admin | Updated: December 6, 2015 03:14 IST

अंगावर अ‍ॅसिड टाकून पत्नीचा निर्घृणपणे खून करणाऱ्या एका आरोपी पतीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.

मालमत्ता हडपण्यातून कृत्य : खून दडपण्याचा होता प्रयत्ननागपूर : अंगावर अ‍ॅसिड टाकून पत्नीचा निर्घृणपणे खून करणाऱ्या एका आरोपी पतीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. मिथिलेश सुरेश बोरकर (३५), असे आरोपीचे नाव असून तो पाचपावली बारसेनगर येथील रहिवासी आहे. स्वाती बोरकर (३५), असे मृत महिलेचे नाव होते. खुनाची घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिंगाबाई टाकळी भागातील बंधूनगर येथे घडली होती. प्रत्यक्ष ही घटना ३ आॅगस्ट २०१५ रोजी घडली होती. १७ आॅक्टोबर २०१५ रोजी मृत महिलेची आई आशा रूपलाल गणवीर (५२) यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविच्या ३०२, ४९८ (अ), ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. स्वातीच्या वडिलांची मालमत्ता हडपण्यातून मिथिलेश बोरकर हा तिचा मानसिक व शरीरिक छळ करायचा. ३ आॅगस्ट २०१५ रोजी त्याने तिच्या अंगावर अ‍ॅसिड टाकले होते. परिणामी ती ७ आॅगस्ट रोजी मेयो इस्पितळात उपचार घेताना मरण पावली होती. पोलिसांनी मिथिलेश याला अटक केल्यानंतर त्याचा सहा दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला होता. परंतु त्याने तपासात पोलिसांना कोणतेही सहकार्य केले नव्हते. दरम्यान आरोपीने जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु प्रकरण गंभीर असल्याने आणि तो साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता असल्याने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील पंकज तपासे यांनी बाजू मांडली. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक डी. एम. भेदोडकर हे आहेत.(प्रतिनिधी)