शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी पत्नीचा घेतला बळी

By admin | Updated: June 2, 2017 02:37 IST

लग्नात मनासारखा हुंडा मिळाला नाही म्हणून नवऱ्याने पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले.

नवऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या : तहसील ठाण्यात गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नात मनासारखा हुंडा मिळाला नाही म्हणून नवऱ्याने पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. रोशनी तुषार शेंडे (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव आहे.भंडारा जिल्ह्यातील सिल्ली अंबाडी येथील रहिवासी असलेल्या रोशनीचा विवाह डिसेंबर २०१५ मध्ये तुषार विश्वेश्वरावर शेंडे (वय २८) याच्यासोबत झाला होता. तुषार केबल कनेक्शनचे काम करतो. तो जागनाथ बुधवारी परिसरात राहतो. वधूपित्याने लग्नाच्या वेळी रितिरिवाजाप्रमाणे सर्वकाही देणेघेणे केले. मात्र, लग्नात मनासारखा हुंडा मिळाला नसल्याचे सांगत आरोपी तुषार रोशनीचा छळ करू लागला. माहेरून हुंडा आणावा म्हणून छळत होता. हा प्रकार रोशनीने आपल्या माहेरच्यांना सांगितला होता. मात्र, हळूहळू होईल सर्व बरे, असे सांगून माहेरच्यांनी तिची समजूत काढली होती. इकडे तुषारकडून होणारा छळ वाढल्यामुळे कंटाळलेल्या रोशनीने घराजवळच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी तिचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात आढळला. नातेवाईकांनाही धमकी ही माहिती कळताच रोशनीचे माहेरचे नातेवाईक भंडाऱ्याहून नागपुरात आले. रोशनीने तुषारच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा त्यांनी आरोप लावला. रोशनीचे वडील आनंदराव मुरलीधर पालांदूरकर यांनी तशी तक्रार तहसील ठाण्यात नोंदवली. आरोपी तुषारने रोशनीचा बळी घेतानाच आपल्याला, पत्नीला आणि मुलीला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद केले. पालांदूरकर यांच्या तक्रारीवरून तहसीलचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. कडलग यांनी आरोपी तुषारविरुद्ध हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीला अटक झालेली नव्हती.