शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीनेच ३ लाखात दिली पतीच्या हत्येची सुपारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:09 IST

नागपूर : वंजारीनगर येथील प्राॅपर्टी डीलर प्रदीप बागडे हत्याकांडाचा छडा पाेलिसांनी लावला. या प्रकरणात पत्नीनेच ३ लाख रुपयात हत्येची ...

नागपूर : वंजारीनगर येथील प्राॅपर्टी डीलर प्रदीप बागडे हत्याकांडाचा छडा पाेलिसांनी लावला. या प्रकरणात पत्नीनेच ३ लाख रुपयात हत्येची सुपारी दिल्याचे समाेर आले आहे. ग्रामीण पाेलिसांच्या एलसीबी पथकाने बागडेंची पत्नी सीमा हिला बेड्या ठाेकल्या. यादरम्यान हत्येतील आराेपी पवन चाैधरीचे पाेलिसांशीही मधुर संबंध असल्याची बाब समाेर आली आहे.

वंजारीनगर निवासी प्राॅपर्टी डीलर प्रदीप बागडे यांचे अपहरण करून पवन चाैधरीने त्याच्या अल्पवयीन सहकाऱ्याशी मिळून हत्या केली हाेती. मंगळवारी सकाळी खापा येथे मृतदेह मिळाल्यानंतर हत्या झाल्याचे उघड झाले. यानंतर हुडकेश्वर पाेलिसांनी पवन चाैधरी व अल्पवयीन सहकाऱ्याला ताब्यात घेतले. पवन हा बागडेंच्या जमिनीवर चायनीजचा ठेला लावत हाेता. जमिनीच्या वादातूनच बागडेंची हत्या केल्याचे त्याने सांगितले. मात्र पाेलिसांना त्याच्या कबुलीबाबत संशय हाेता. त्यानंतर हुडकेश्वर पाेलिसांनी दाेघांनाही ग्रामीण पाेलिसांच्या स्वाधीन केले. एलसीबीने कसून चाैकशी केल्यानंतर पवनने बागडेच्या पत्नीनेच पतीच्या हत्येसाठी ३ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे कबूल केले. त्यानंतर आज दुपारी सीमाला अटक करण्यात आली.

सूत्रांच्या माहितीनुसार, सीमा व प्रदीप बागडे यांच्यामध्ये वाद वाढले हाेते. सीमाच्या मित्रत्वाबाबत प्रदीप प्रश्न करीत हाेता व ही बाब सीमाला आवडत नव्हती. बागडेने प्राॅपर्टी डीलिंगमधून संपत्ती जमविली हाेती. मात्र ताे सीमाच्या मार्गातील काटा ठरला हाेता. त्यामुळे स्वत:चा मार्ग माेकळा करण्यासाठी पतीच्या हत्येची याेजना आखली. पवन त्यांच्या घरी भाड्याने राहत हाेता व कार वाॅशिंगसाठी बागडेच्या घरी येत-जात हाेता. सीमाने पवनला ३ लाख रुपयात हत्येची सुपारी दिली. ५० हजार रुपये ॲडव्हान्स दिले व २.५० लाख रुपये हत्येनंतर देण्याचे ठरले. १६ सप्टेंबरला पवन आणि त्याच्या सहकाऱ्याने बागडेला वरुडला नेले. येथेच हत्या करून मृतदेह पोत्यात भरून सिंदेवाही मार्ग खापा येथे फेकून दिला. मिळालेल्या माहितीनुसार पवनचे हुडकेश्वर व अजनी येथील पाेलिसांशी मित्रत्व आहे. ताे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पार्टी देत हाेता. त्यामुळे त्याने हुडकेश्वर पाेलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून समर्पण केल्याचे बाेलले जात आहे. सीमाने हत्येचे खरे कारण सांगितले नाही पण पाेलिसी हिसका दाखविल्यानंतर सत्य बाहेर येईल, अशी शक्यता आहे.