शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पतीला गलिच्छ शिवीगाळ करणारी पत्नी क्रूरच; हायकोर्टाचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 20:27 IST

पतीस गलिच्छ शिवीगाळ करणाऱ्या, आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या व छोट्या-छोट्या गोष्टींवरून आकांततांडव करणाऱ्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने क्रूर ठरवून घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला.

ठळक मुद्देघटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पतीस गलिच्छ शिवीगाळ करणाऱ्या, आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या व छोट्या-छोट्या गोष्टींवरून आकांततांडव करणाऱ्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने क्रूर ठरवून कुटुंब न्यायालयाचा घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला.२८ डिसेंबर २०१५ रोजी कुटुंब न्यायालयाने पती राहुलला पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मंजूर केला होता. त्याविरुद्ध पत्नी निताने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता निताचे अपील फेटाळून लावले. या दोघांचे २ जानेवारी २००५ रोजी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी आहे. राहुलने लग्नानंतर काही दिवसांनी आई-वडिलांना भेटायला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून निताने आकांततांडव केला. राहुलसोबत बोलने सोडून दिले. ती सासरच्या मंडळींना योग्य वागणूक देत नव्हती. ती बाळंतपण झाल्यानंतर सहा महिने माहेरी राहिली. मुलीच्या बारशाची राहुलला वेळेवर माहिती दिली. राहुलला सोडून माहेरी निघून गेल्यानंतर निताने तडजोडीचे काहीच प्रयत्न केले नाही. तसेच, राहुलकडून झालेल्या तडजोडीच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला नाही. ती दहा वर्षावर काळापासून विभक्त रहात आहे. उच्च न्यायालयाने या सर्व बाबी लक्षात घेता निताला दिलासा देण्यास नकार दिला.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय