शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

मुक्या प्राण्याची वेडी माया!

By admin | Updated: December 6, 2015 03:27 IST

चित्रपट, मालिकांमधून मुक्या प्राण्यांचे मालकांवरील प्रेम दाखविण्यात येते. इतिहासाची पाने चाळली तर अशी अनेक उदाहरणे आहेत की,...

माकडाला मित्राची प्रतीक्षा : ठाण्याच्या आवारात ठिय्यागणेश खवसे नागपूरचित्रपट, मालिकांमधून मुक्या प्राण्यांचे मालकांवरील प्रेम दाखविण्यात येते. इतिहासाची पाने चाळली तर अशी अनेक उदाहरणे आहेत की, मालकासाठी वेळप्रसंगी मुक्या प्राण्याने जीवही दिला. घोडा असो की कुत्रा, अगदी घरातील पाळीव मांजर किंवा कबुतर... ‘ते’ मनुष्याच्या मदतीला धावले. ज्याने ‘मुक्या’ प्राण्याशी जीव लावला, त्या मालकाच्या मृत्यूनंतर मात्र हे मुके जीव कासावीस होते. त्यांच्या नैसर्गिक स्वभावात फरक पडतो. अशीच एक घटना गिट्टीखदानमध्ये उघडकीस आली आहे. आपल्याला प्रेम करणाऱ्याचा मृत्यू झाल्याचे ‘ते‘माकड मानायला तयार नाही. त्यामुळे तब्बल ३० तासांपासून ते पोलीस ठाण्याच्या आवारातच घुटमळत आहे. या घटनेतून पुन्हा एकदा मुक्या जीवांच्या मायेचा प्रत्यय आला आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास गिट्टीखदान पोलिसांना निनावी फोनद्वारे माहिती मिळाली की, कळमेश्वर मार्गावरील जुनापाणी शिवारात एक माकड विहिरीजवळ नुसते ओरडत आहे. ते अस्वस्थपणे इकडून तिकडे चकरा मारते. कुणालाच विहिरीजवळ जाऊ देत नाही. त्यामुळे नेमके घडले काय, ते कळायला मार्ग नाही. पोलिसांना हे कळताच गिट्टीखदान पोलिसांचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. विहिरीजवळ माकड होते. आतापर्यंत कुणाला जवळ येऊ न देणारे ते माकड पोलिसांना पाहून धावतच जवळ आले. नंतर त्यांच्या पुढे पुढे विहिरीजवळ पोहचले. पोलिसांनी विहिरीत डोकावले. पाहतात तर पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह होता. पोलिसांनी तो बाहेर काढला आणि तो रुग्णालयाकडे रवाना करण्यासाठी वाहनात टाकला. ते पाहताच माकडानेही पोलिसांच्या वाहनात उडी घेतली. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात रवाना केला अन् पोलीस गिट्टीखदान ठाण्यात पोहोचले. माकडही सोबतच होते. त्याला ‘मालक‘ ठाण्यात येईल, अशी आशा आहे. त्यामुळे ते गेल्या ३०-३२ तासांपासून ठाण्यातच ठिय्या देऊन आहे. दिवसभर पोलीस ठाण्यात वर्दळ असते. ते माकड माणसाळलेले असल्याने कुणालाही त्याने त्रास दिला नाही. मात्र, ठाण्यातून रुग्णालयात गेलेल्या आणि नंतर पुन्हा ठाण्यात पोहचलेल्या पोलिसांना ते ओळखते. यामुळे ते त्याच्या मांडीवर उडी मारून बसते. जणू त्याला आपला मालक कुठे आहे, अशी विचारणा करते.त्याच्या अस्वस्थतेने पोलीसही अस्वस्थमालकाच्या मृत्यूनंतर या मुक्या जीवाची झालेली अवस्था कर्तव्यकठोर पोलिसांनाही अस्वस्थ करणारी ठरली आहे. याला आता कसे सांभाळायचे, असा प्रश्न असल्यामुळे पोलिसांनी शनिवारी रात्री या मुक्या जीवाला एका वन्यप्रेमीच्या हवाली केले.‘त्याची’ही नाही पटली ओळख जुनापाणी शिवार कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. मात्र, या प्रकाराची माहिती मिळाल्याने घटनास्थळी पोहचलेल्या गिट्टीखदान पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. त्यानंतर प्रकरण कळमेश्वर पोलिसांकडे सोपविले. मृत कोण कुठला, ते अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस सांगतात.