शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

काँक्रिटच्या घरात पेटवायच्या का चुली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST

श्याम नाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाचे जगणे कठीण हाेत चालले आहे. केंद्र शासनाने ऐन ...

श्याम नाडेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाचे जगणे कठीण हाेत चालले आहे. केंद्र शासनाने ऐन सणासुदीच्या काळात घरगुती वापराच्या गॅसच्या किमती प्रति सिलिंडर ५० रुपयांनी वाढविल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागली आहे. त्यामुळे आता सिमेंट काँक्रिटच्या घरात आता चुली पेटवून स्वयंपाक करायचा काय, असा प्रश्नही गृहिणींनी उपस्थित केला आहे.

वर्षभरापासून दर महिन्याला घरगुती वापराच्या गॅसच्या किमती वाढत आहेत. याची सर्वाधिक झळ सामान्य माणसाला बसत आहे. ऑगस्टमध्ये गॅस सिलिंडरच्या किमती २५ रुपयांनी तर सप्टेंबरमध्ये ५० रुपयांनी वाढविण्यात आल्या आहेत. डिसेंबर २०२० मध्ये ६५४.५० रुपयात मिळणारे गॅस सिलिंडर सप्टेंबर २०२१ मध्ये ९४५ रुपयांना खरेदी करावे लागत असल्याची माहिती अनेक गृहिणींनी दिली.

अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील बहुतेकांनी त्यांची घरे सिमेंट काँक्रिटनी बांधली आहेत. त्यात शासनाच्या घरकुल व इतर याेजनांतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या घरांनी भर टाकली आहे. या सिमेंटच्या घरांमध्ये चुली पेटवायच्या का, त्यासाठी लागणारे सरपण आणायचे कुठून, असा प्रश्नही संतप्त महिलांनी उपस्थित केला. मागील १० महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये प्रति सिलिंडर २९०.५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरसाठी ९४५ रुपये मोजावे लागत असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त हाेत आहे.

...

दीड वर्षापासून सबसिडी बंदच

सामान्य ग्राहकांना केंद्र शासनाच्या वतीने प्रति सिलिंडर सबसिडी दिली जायची. ही सबसिडी दीड वर्षांपासून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, अशी माहिती ग्राहकांनी दिली. उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना प्रति सिलिंडर ४३.९० रुपये सबसिडी दिली जात असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. त्यांना सिलिंडरच्या किमतीप्रमाणे ३२० रुपये अनुदान मिळायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

...

नऊ महिन्यात सातव्यांदा दरवाढ

१ जानेवारीपासून आजवर घरगुती वापराच्या सिलिंडरची तब्बल सातव्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. सिलिंडरवरील सबसिडी बंद करण्यात आल्याने, ही दरवाढ सामान्यांचे आर्थिक कंबरडे माेडत आहे. ऑगस्टमध्ये व्यावसायिक वापराच्या सिलिंडरला काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, सप्टेंबरमध्ये प्रति सिलिंडर ७० रुपयांची वाढ करण्यात आल्याने हा दिलासा कुचकामी ठरला. व्यावसायिक सिलिंडरसाठी आता प्रति सिलिंडर १,८४६ रुपये मोजावे लागतात. मागील महिन्यात या सिलिंडरच्या किमती पाच रुपयांनी कमी करून या महिन्यात ७० रुपयांनी वाढविल्या आहेत.

...

घर सिमेंटचे असल्यामुळे सिलिंडरशिवाय पर्याय नाही. घरात चूल पेटवायला जागाच नाही. दर वाढले तरी गरज असल्याने ते खरेदी करावेच लागते. बाकी खर्चात केलेली काटकसर सिलिंडर दरवाढीच्या रूपाने काढून घेतली जात आहे. गृहिणींची बाजू घेऊन लढणारे आता मूग गिळून चूप बसले आहेत.

- सुवर्णा शेंडे, गृहिणी, नरखेड.

...

सिलिंडरचा वापर कमी करायचे तर चूल हा एकमेव पर्याय आहे. चुलीसाठी सरपण आणायचे कुठून, ही समस्या आहे. चुलीमुळे खालची फरशी टाईल्स तापणार असल्याने नवी समस्या निर्माण हाेईल. त्यातून नुकसान सहन करावे लागेल.

- निर्मला अरमरकर, गृहिणी, नरखेड.

...

सिलिंडरचे दर

डिसेंबर - ६५४.५० रुपये

जानेवारी - ७५४.५० रुपये

फेब्रुवारी - ८५४.५० रुपये

मार्च - ८७९.५० रुपये

एप्रिल - ८६९.५० रुपये

मे - ८६९.५० रुपये

जून - ८६९.५० रुपये

जुलै - ८६९.५० रुपये

ऑगस्ट - ८९५ रुपये

सप्टेंबर- ९४५ रुपये