शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अख्खे कुटुंबच मनरेगाच्या कामावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST

अभय लांजेवार उमरेड : वडील, आई, पत्नी आणि भावजय अशा संपूर्ण कुटुंबाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या ...

अभय लांजेवार

उमरेड : वडील, आई, पत्नी आणि भावजय अशा संपूर्ण कुटुंबाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर ‘हजेरी’ लावत एका रोजगार सेवकाने अपहाराचा कारनामा केल्याची बाब उजेडात आली आहे. उमरेड तालुक्यातील शेडेश्वर या गावामधील हा प्रकार असून रोजगार सेवकाने नियमावलीला वेशीवर टांगत संपूर्ण कुटुंबालाच मनरेगाच्या कामावर दाखविले. अंकुश भाऊराव पाटील असे या ग्रामरोजगार सेवक तथा पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच उमरेड तालुक्यातील सोनपुरी येथील मनरेगा भ्रष्ट्राचार प्रकरणाचा कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उमरेड येथून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या शेडेश्वर येथे मनरेगा योजना अंतर्गत विखुरलेले वृक्ष लागवडीचे काम मंजूर झाले होते. २०२१ ला भाग २ मध्ये हे काम करण्यात आले. अशातच मनरेगाच्या या कामावर ग्रामरोजगार सेवक अंकुश पाटील याने कुटुंबातील सदस्यांना कामावर दाखूवन शासनाची दिशाभूल केली. भाऊराव पाटील (वडील), राजस पाटील (आई), मिनाक्षी पाटील (पत्नी) आणि अंजू पाटील (भावजय) अशी कुटुंबीयांची नावे असून ऑनलाईन डिमांड व जमा झालेल्या मजुरी मस्टरच्या नोंदीवरून हा प्रकार उजेडात आला आहे.

मिनाक्षी पाटील यांची या कामावर ६८ दिवस हजेरी लावण्यात आली असून १६,८६४ रुपये असा मोबदला सुद्धा बँकेच्या खात्यात जमा झाला आहे. भाऊराव आणि राजस पाटील यांच्या नावे एकूण ९४ दिवसांची हजेरी आणि २३,३१२ रुपयांची नोंद झाली आहे. अंजू पाटील यांच्या नावाने १०८ दिवसांची हजेरी लावत २६,७८४ रुपये खात्यात जमा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. २० एप्रिल ते २३ ऑगस्ट २०२१ या चार महिन्यातील हा प्रकार असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.

‘मनरेगाच्या कामात शेडेश्वर येथे भ्रष्ट्राचार झाला, ही बाब सत्य आहे. रोजगार सेवकाने स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांना कामावर दाखविले. कुटुंबातील सर्व मजुरी मस्टरची रक्कम प्रत्येक खातेदाराच्या सिर्सी येथील एका बँकेत जमा झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास आणखी काहींची नावे समोर येण्याचीही शक्यता आहे.

भारत थुटे, ग्रामपंचायत सदस्य, सिर्सी, ता. उमरेड

---

काही दिवसांपूर्वीच याबाबतची तक्रार आलेली आहे. चौकशी सुद्धा लावण्यात आली असून चौकशीअंती अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाईचे पाऊल उचलण्यात येईल.

जयसिंग जाधव

खंडविकास अधिकारी, पंचायत समिती, उमरेड

---