शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंची लेनदेन काळजी कोण घेणार ?

By admin | Updated: June 26, 2015 02:41 IST

लाखोंची लेनदेन करताना पुरेशी खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे उपराजधानीत चोर-लुटारूंचे फावते आहे.

हलगर्जीपणा भोवतोय : व्यापाऱ्यांसोबतच पोलिसही अस्वस्थनागपूर : लाखोंची लेनदेन करताना पुरेशी खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे उपराजधानीत चोर-लुटारूंचे फावते आहे. इतवारीतील धर्मेंद्र झिलपे या धान्य दलालाचे पाच लाख रुपये लुटारूंनी बुधवारी सायंकाळी झटक्यात लंपास केले. त्यानंतर पुन्हा एकदा व्यापारी आणि लुटमारीचा विषय चर्चेला आला आहे. ८ जूनला दिवसाढवळ्या सराफा व्यावसायिक कक्कड यांचे आठ लाख रुपये लुटण्यात आले होते. त्यानंतर १३ जून रोजी भंडारा रोडवरील राऊत यांच्या शोरुममधून १७ लाख रुपये चोरण्यात आले. या घटनांची उकल व्हायची असतानाच आता परत पाच लाख रुपये लुटण्यात आले. त्यामुळे व्यापाऱ्यांवर गुन्हेगार सूक्ष्म नजर ठेवून असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, अशी लुटमार झाल्यानंतर व्यापारी पोलिसांच्या नावाने ओरडतात. पोलीस प्रामाणिकपणे गस्त करीत नाहीत. गुन्हेगारांवर पोलिसांचा जरब नाही, असे आरोप करतात. या घटनेमुळे पुन्हा एकदा व्यापारीबांधवांमध्ये दहशत आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, व्यापारी पोलिसांवर रोष व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकारीही या घटनेमुळे अस्वस्थ झाले असून, ‘स्ट्रीट क्राईम’ रोखण्यासाठी कोणत्या झोनमधून कोणते प्रयत्न केले गेले, त्याचा आढावा पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी घेतला आहे. रस्त्यावर होणारी गुन्हेगारी (स्ट्रीट क्राईम) रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा, अन्यथा निष्क्रिय पोलिसांवरच कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर, बुधवारी काही ठाणेदारांच्या अंतर्गत बदल्याही करण्यात आल्या. कुठे आहेत सीसीटीव्हीगुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्हीचा मोठा फायदा होऊ शकतो. काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने पायलट प्रोजेक्टच्या नावाखाली उपराजधानीतील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला होता. महापालिका आणि पोलीस विभागाने त्यासाठी एक प्रस्ताव पाठविला. मात्र, प्रस्तावात सीसीटीव्हीचा खर्च कोट्यवधीत असल्याचे पाहून तो थंडबस्त्यात टाकण्यात आला. त्यानंतर उपराजधानीतील ८०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. १४ कोटींच्या या प्रस्तावालाही सरकारने थंडबस्त्यात टाकले. त्यानंतर वाहतूक शाखेचे तत्कालीन उपायुक्त चंद्रकिशोर मीणा यांनी दोन कोटींचा प्रस्ताव तयार केला. महत्वाच्या २०० ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची योजना या प्रस्तावात होती. मात्र, त्यालाही अद्याप मंजुरी मिळाली नाही.