शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

खाप्यात कोण मारणार मैदान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST

पुरुषोत्तम नागपूरकर खापा : डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपालिकेच्या वाॅर्ड रचनेचे आदेश राज्य निवडणूक ...

पुरुषोत्तम नागपूरकर

खापा : डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपालिकेच्या वाॅर्ड रचनेचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या आदेशानंतर खापा शहरातील राजकीय पार वर चढतोय. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या मतदार संघात मोडणाऱ्या खापा नगरपरिषदेत यावेळी कोणाची सत्ता येणार याकडे राजकीय पंडितांचे लक्ष लागले आहे.

२०१७ मध्ये भाजपाने खाप्याचे मैदान मारले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढले होते. तीत १७ पैकी १५ जागांवर भाजपा, काँग्रेस (१) तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. नगराध्यक्षाच्या थेट निवडणुकीत भाजपाच्या प्रियंका मोहटे विजयी झाल्या होत्या. प्रभाग पद्धतीने ही निवडणूक झाली होती. आता वाॅर्डनिहाय निवडणूक होईल. एका वाॅर्डात एक सदस्य अशी निवडणूक होणार असल्याने उमेदवारांची संख्या निश्चित वाढणार आहे. सावनेर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यश मिळवल्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यात उत्साह आहे. इकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची या निवडणुकीत काय भूमिका राहील, याकडे लक्ष लागले आहे.

नगराध्यक्षपदासाठी होते सहा उमेदवार

२०१७ मध्ये पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षाची थेट जनतेतून निवड झाली होती. सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झालेल्या जागेसाठी सहा महिला उमेदवार रिंगणात होते. या भाजपच्या प्रियंका मोहटे यांनी ३,८८६ मते मिळवित बाजी मारली. काँग्रेसच्या प्रज्ञा बुरडे यांना २,०४०, शारदा बारापात्रे (अपक्ष) १,८०६ तर शिवसेनेच्या किती कोसे यांना ९०० मिळाली होती. यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे त्यासोबतच नगराध्यक्षपद कोणत्या संवर्गासाठी राखीव राहते ही महत्त्वाची ठरेल.

विकास आणि वाद

गत पाच वर्षात खापा शहराचा मेकओव्हर झाला. मात्र विकास कामावरून काँग्रेसने लावलेल्या विविध आरोपांमुळे पालिका चर्चेत राहिली.

020921\img_20210902_181808.jpg

खापा न प निवडणूक