शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मागासवर्गीयांचा निधी कुणी पळविला ?

By admin | Updated: March 31, 2016 03:15 IST

अर्थसंकल्पातील महसुली उत्पन्नाच्या पाच टक्के निधी हा मागासवर्गीय वस्त्यांतील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यावर खर्च होणे अपेक्षित आहे.

विरोधक आक्रमक : सत्ताधारी मागासवर्गीयविरोधी असल्याचा आरोपनागपूर : अर्थसंकल्पातील महसुली उत्पन्नाच्या पाच टक्के निधी हा मागासवर्गीय वस्त्यांतील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यावर खर्च होणे अपेक्षित आहे. परंतु महापालिकेने गेल्या पाच वर्षात निकषानुसार हा निधी खर्च न केल्याने बुधवारी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सभागृहात सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मागासर्गीयांचा निधी पळविल्यासंदर्भात लोकमते वृत्त प्रकाशित केले होते. याचे पडसाद सभागृहात उमटले. महसुली उत्पन्नाच्या पाच टक्के निधी दुर्बल घटकांवर खर्च करणे आवश्यक आहे. परंतु केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)योजनेसाठी करण्यात आलेली तरतूद यात गृहीत धरण्यात आलेली आहे. या निधीचा अर्थसंकल्पातील तरतुदीशी कोणताही संबंध नसल्याचे प्रफुल्ल गुडधे यांनी निदर्शनास आणले. गौतम पाटील यांनी महापालिकेतील सत्ताधारी मागासवर्गीयांच्या विरोधात असल्याने दुर्बल घटकांचा निधी अखर्चित ठेवल्याचा आरोप केला. समितीच्या सभापतींचे निधी वाटप करण्याचे अधिकार काढून घेतले होते. स्लम भागात सिवरेज, पावसाळी नाल्या, रस्ते व पाणीपुरवठा अशा समस्या असूनही हा निधी अखर्चित ठेवण्यात आला. तो पुढील वर्षात समायोजित करण्याची मागणी त्यांनी केली.दुर्बल घटकांचा निधी नियमानुसार खर्च करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले होते. परंतु मागासवगींय वस्त्यांचा विकास व्हावा अशी इच्छा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची नाही. बाल्या बोरकर स्थायी समितीचे अध्यक्ष असतानाही मागासवर्गीयांना डावलून राखीव इतर भागातील विकास कामावर निधी खर्च करण्यात आला होता. गेल्या वर्षात मागासवर्गीयांच्या वस्त्यांत कोणतीही विकास कामे झालेली नाही. हा अखर्चित निधी यंदाच्या अर्थसंकल्पात दर्शविलेला नाही. हा मागासवर्गीयावर अन्याय असल्याचे संदीप सहारे यांनी निदर्शनास आणले. निकषानुसार दुर्बल घटकांसाठी पाच टक्के निधी खर्च करणे बंधनकारक आहे. तो इतर भागातील विकास कामावर खर्च करणे योग्य नसल्याचे मत सुजाता कोंबाडे यांनी व्यक्त केले. इतर सदस्यांनीही मागासर्गीयाचा निधी पळविण्यावर तीव्र नाराची व्यक्त केली. (प्रतिनिधी)