शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएफ’चे व्याज गेले कुठे?

By admin | Updated: June 2, 2017 02:15 IST

सध्या संपूर्ण देशातील नोकरदार त्रस्त आहेत. जून महिना सुरू झाला आहे. मात्र त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात

नोकरदार त्रस्त : ‘सॉफ्टवेअर अपडेट’चे केले जातेय कारण समोर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या संपूर्ण देशातील नोकरदार त्रस्त आहेत. जून महिना सुरू झाला आहे. मात्र त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात आतापर्यंत वर्ष २०१६-१७ च्या व्याजाची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे कर्मचारी चिंतेत आहेत. यावर्षी असे का झाले असा प्रश्न त्यांना पडला आहे. लोकमतने या संदर्भात चौकशी केली असता ही असे उघडकीस आले की, मे च्या पंधरवड्यात पीएफच्या व्याजाची रक्कम अपलोड केली जाते. एसएमएसच्या माध्यमातून याची माहितीसुद्धा दिली जाते. परंतु यावर्षी असे झालेच नाही. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमुळे नोकरदार वर्गाला या समस्येला सामोरे जावे लागले आहे. सूत्रानुसार केंद्र सरकार कामगार-कर्मचाऱ्यांशी संबंधित सर्व संस्थांना (उदा. पीएफ, ईएसआयसी) ची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने युनिकोड पोर्टल तयार करीत आहे. यासाठी पीएफ कार्यालय आणि त्याच्या वेबसाईटला युनिकोडमध्ये बदलविले जात आहे. हे काम डिसेंबरपासून सुरू झाले आहे. मे महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. परंतु ते अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. आता असे सांगितले जात आहे की, जूनच्या पंधरवड्यात हे काम पूर्ण करून व्याजाच्या रकमेला पीएफ खात्यामध्ये अपलोड केले जाईल. सॉफ्टवेअर अपडेट होत असल्यामुळे पीएफ आॅफिसमधील अनेक वेबसाईट सुद्धा उघडत नाही. त्यावर केवळ निर्माणाधीन असल्याचा संदेश दाखविला जात आहे. या संदर्भात पीएफ आयुक्त अनिमेश मिश्रा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही. डिसेंबरमध्ये झाली होती ८.६५ टक्केची शिफारसईपीएफ बोर्डाने १९ डिसेंबर रोजी वर्ष २०१६-१७ साठी पीएफच्या रकमेवर ८.६५ टक्के व्याज देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. केंद्राने १६ एप्रिल रोजी यावर शिक्कामोर्तब केले. मागील दोन वर्षांपासून ८.८ टक्के व्याज दिले जात होते, हे विशेष.