निशांत वानखेडेनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली लाखो अनुयायांसमवेत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. नागपूरला झालेल्या या सोहळ्याचे साक्षीदार म्हणून दीक्षास्थळी ३० रजिस्टर स्वाक्षरीसाठी ठेवण्यात आले होते. अर्थातच डॉ. बाबासाहेब आणि माईसाहेबांनी त्यावर पहिली सही केली होती. त्यानंतर हजारो लोकांच्या त्यावर स्वाक्षऱ्या होत्या. मात्र हा मौल्यवान ठेवा पूढे कुठे गहाळ झाला, जो आजतागायत सापडला नाही.
डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. अतिनाश फुलढोले यांनी आपल्या शोध प्रबंधाअंतर्गत अभ्यासलेल्या 'महाराष्ट्र गॅड्रोटियर मध्ये असलेल्या या उल्लेखाबाबत माहिती दिली, दीक्षा समारंभाच्या वेळी या ऐतिहासिक सोहळ्याची साक्ष म्हणून लोकांच्या स्वाक्षन्यांसाठी ३० रजिस्टर ठेवण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आणि माईसाहेब यांनी धम्म दीक्षा ग्रहण केल्यानंतर यातील एका रजिस्टरवर सर्वांत आधी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यानंतर दादासाहेब गायकवाड, वामनराव गोडबोले, सदानंद फुलझेले अशा मोठ्या नेत्यांनीही बाबासाहेबांनंतर स्वाक्षन्या केल्या होत्या.
त्यानंतर उपस्थितांपैकी ६० हजार लोकांच्या या ३० रजिस्टरवर स्वाक्षऱ्या असल्याची माहिती आहे. उपस्थित असलेल्या ६ लाख लोकांपैकी बहुतेक अशिक्षितच होते, हे विशेष, मात्र ६० हजार लोकांच्या स्वाक्षन्या हीसुद्धा मोठी गोष्ट होती. ही सर्व रजिस्टरे वामनराव गोडबोले यांनी त्यानंतर जपून ठेवल्याचेही सांगण्यात येत आहे.
१९५७ च्या निवडणुकीनंतर कोर्टातही झाले सादरडॉ. अविनाश फुलझेले यांनी सांगितले, बाबासाहेबांच्या निधनानंतर १९५७ साली झालेल्या नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे १० उमेदवार नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. यात सदानंद फुलझेले, श्री. टी. मेश्राम आदींचा समावेश होता. मात्र हे नगरसेवक बौद्ध आहेत व महापालिकेच्या जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत, असे सांगत, या सर्वांच्या नगरसेवक पदावर आक्षेप घेण्यात आला होता. प्रकरण न्यायालयात गेले. तेव्हा दीक्षा समारंभातील है रजिस्टर न्यायालयातही मादर करण्यात आले होते. त्यानंतर या रजिस्टरचे पुढे काय झाले, ते कुठे गेले याचा पत्ता लागला नाही. समारंभाशी संबंधित बहुतेकांनी वाद्याबत नकार दिल्याचे डॉ. फुलझेले यांनी सांगितले.