शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीचे आई-वडील गेले कुठे ?

By admin | Updated: July 28, 2016 02:27 IST

मातृत्व सुखापासून वंचित असलेल्या एका महिलेने स्वत:ला संपविल्याची हृदयविदारक घटना मंगळवारी घडली आणि त्याच दिवशी स्वत:च्या पोटच्या गोळ्याला सोडून...

नागपूर : मातृत्व सुखापासून वंचित असलेल्या एका महिलेने स्वत:ला संपविल्याची हृदयविदारक घटना मंगळवारी घडली आणि त्याच दिवशी स्वत:च्या पोटच्या गोळ्याला सोडून मायबापाने पलायन केल्याची बाब उघडकीस आली. या दोन्ही घटना मानवाच्या भावनिकतेवर आघात करणाऱ्या आहेत. एकीकडे मातृत्वाची लालसा आत्महत्येसाठी प्रवृत्त करते, दुसरीकडे मातृत्व शाप ठरल्यागत, वागणूक एका चिमुकल्या जीवाला मिळत आहे. नागपूर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालयात बुधवारी सकाळी एक महिला पोलीस कर्मचारी आली. ही महिला पोलीस नरखेड पोलीस ठाण्यातील कर्मचारी असल्याचे तिने सांगितले. तिच्या सोबत एक वर्षाची चिमुकलीही होती. या महिला पोलिसाने सांगितलेली चिमुकलीची हकीकत मनाला अस्वस्थ करणारी होती. या चिमुकलीला तिच्या आईवडिलांनी नरखेड तालुक्यातील पिपळा (के) ग्रामपंचायतमध्ये मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास सोडून गेल्याचे महिला पोलिसाने सांगितले. ग्रामस्थांनी आईवडिलांचा भरपूर शोध घेतल्यानंतर दुपारच्या सुमारास नरखेड पोलिसांना माहिती देण्यात आली. नरखेड पोलिसांनीही आईवडिलांचा शोध घेतला, परंतु त्यांच्या कुठेच पत्ता न लागल्याने, त्यांनी या मुलीला अनाथालयात हलविण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्याकडे आणले. संरक्षण अधिकाऱ्यांनी तिला शहरातील एका अनाथालयात ठेवले असून, गुरुवारी बाल कल्याण समितीपुढे तिला सादर करण्यात येणार आहे. मुलांना वाऱ्यावर सोडणे ही क्रू रता मुलांना वाऱ्यावर सोडणे ही गंभीर बाब असून, बाल संरक्षण अधिनियम २०१५ अन्वये आई-वडिलांना शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे हातून घडलेली चूक सुधारायची असेल तर आईवडिलांपुढे एक संधी आहे. त्यांनी तत्काळ दखल घ्यावी, संरक्षण कार्यालयापुढे त्यांचे समुपदेशन करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी केले आहे.