शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

मनी आॅर्डर गेली कुठे ?

By admin | Updated: November 28, 2014 01:00 IST

वीज बिल भरण्यासाठी एक हजार रुपयांची मनी आॅर्डर पाठवून १८ दिवस होऊनही गंतव्य ठिकाणी पोहचली नाही. मनी आॅर्डर पाठविणारा मुलगा व वाट पाहणारे वडील दोघेही पोस्टाच्या अजब कारभाराचे बळी पडले आहे.

वीज बिलासाठी पाठविलेल्या मनी आॅर्डरचा पत्ता मिळेनानागपूर : वीज बिल भरण्यासाठी एक हजार रुपयांची मनी आॅर्डर पाठवून १८ दिवस होऊनही गंतव्य ठिकाणी पोहचली नाही. मनी आॅर्डर पाठविणारा मुलगा व वाट पाहणारे वडील दोघेही पोस्टाच्या अजब कारभाराचे बळी पडले आहे. पाठविलेल्या मनी आॅर्डरची चौकशी कुठे करावी असा प्रश्न मुलाला पडला आहे. वाठोडा येथे राहणारे अनिल आनलवार यांनी १० नोव्हेंबर रोजी वडील मधुकर आनलवार (मु.पो. गोवर्धन ता. मूल) यांना नागपुरातील नंदनवन पोस्ट कार्यालयातून वीज बिल भरण्यासाठी हजार रुपयांचा मनी आॅर्डर केला. मनी आॅर्डर पाठविल्याची रसीद त्यांना देण्यात आली. वडिलांना मनी आॅर्डर केल्याची माहिती फोनवरून दिली. दहा दिवस झाल्यावरही मनी आॅर्डर मिळाली नसल्याने वडिलांची चिंता वाढली. यासंदर्भात वडिलांनी गोवर्धन पोस्टात चौकशी केली. मात्र त्यांच्या नावे काहीच आले नसल्याचे सांगितले. माहिती मिळताच अनिलने नंदनवन पोस्टात चौकशी केली. त्यांना बेंबाळा ब्रांच पोस्ट कार्यालयात मनी आॅर्डर पोहचल्याचे सांगण्यात आले. बेंबाळा पोस्टात चौकशीअंती सिस्टम खराब असून मनीआॅर्डर पोहचलाच नाही असे सांगितले. अनिल यांना नंदनवन पोस्टातून योग्य माहिती मिळत नाही. त्यांना बेंबाळा पोस्टात जाऊन चौकशी करा असे सांगण्यात येत आहे.१८ दिवसानंतरही मनी आॅर्डर वडिलांपर्यंत पोहचली नाही अन् मुलालाही परत मिळाही नाही यामुळे पैसे गेले कुठे असा प्रश्न पडला आहे. वीज बिल भरण्यासाठी पाठविलेले पैसे वेळेत मिळाले नाही तर वीज कापली जाऊ शकते याची चिंता बाप-लेकांना पडली आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी गिरीपेठ पोस्ट कार्यालयात जाणार असल्याचे अनिल आनलकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)