शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे बेंच गेले कुठे ?

By admin | Updated: August 22, 2015 03:07 IST

उद्यान वा सार्वजनिक स्थळी वॉर्डातील नागरिकांना बसण्यासाठी मनपाने खरेदी केलेल्या तीन आसन क्षमतेच्या लोखंडी आणि सिमेंट बेंचचा गैरवापर होत असल्याची बाब पुढे आली आहे.

नागपूर : उद्यान वा सार्वजनिक स्थळी वॉर्डातील नागरिकांना बसण्यासाठी मनपाने खरेदी केलेल्या तीन आसन क्षमतेच्या लोखंडी आणि सिमेंट बेंचचा गैरवापर होत असल्याची बाब पुढे आली आहे. त्या-त्या झोनच्या प्रभागातील नगरसेवकांनी कार्यकर्त्यांच्या मर्जीनुसार बेंचचे वाटप केल्यामुळे मनपाचे बेंच गेले कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. खरेदीवर प्रश्नचिन्हमनपाच्या एकूण १० झोनपैकी सतरंजीपुरा, लकडगंज, लक्ष्मीनगर आणि गांधीबाग-महाल या चार झोनमध्ये २०१२-१३, २०१३-१४ आणि २०१४-१५ या तीन वर्षांत जवळपास ९० लाख ६७ हजार रुपये किमतीचे तीन आसनी १२०९ लोखंडी बेंच आणि २५ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सिमेंट बेंच अर्थात १ कोटी १६ लाख रुपयांची बेंच खरेदी मनपाच्या त्या-त्या झोनच्या अधिकाऱ्यांनी केल्याची बाब अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या केंद्रीय सहसचिव संध्या माहूरकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मनपाला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात उघड झाली आहे. तीन वर्षांत लोखंडी आणि सिमेंटचे १८४६ बेंच गेले कुठे, असा नागरिकांचा सवाल आहे. तर दरवर्षी होणारी बेंचची खरेदी ही बाबसुद्धा शंकांना खतपाणी घालणारी आहे. नगरसेवकांनी शहानिशा करावीबेंचचा उपयोग उद्यान वा सार्वजनिक स्थळी करण्यात यावा, असा नियम आहे. पण हे बेंच कुठे बसविले आहेत, याची आकडेवारी काही वगळता बहुतांश नगरसेवकांकडे उपलब्ध नाही. कार्यकर्त्यांना बेंच दिले म्हणून आपले काम संपले, असे त्यांना म्हणता येणार नाही. त्याचा उपयोग होतो वा नाही, याची शहानिशा नगरसेवकांनी करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे केंद्रीय महासचिव देवेंद्र तिवारी आणि शहर अध्यक्ष ज्ञानदेव गोळे यांनी लोकमतशी बोलताना केली.प्राप्त माहितीनुसार सतरंजीपुरा झोनमध्ये २०१२-१३, २०१३-१४ आणि २०१४-१५ या तीन वर्षांत २९० लोखंडी तर ४७ सिमेंट बेंच खरेदी केले. यासाठी मनपाला २३ लाख ६३ हजार रुपये मोजावे लागले. याशिवाय लक्ष्मीनगर झोनमध्ये २०१३-१४ या वर्षांत ३ लाख ३० हजार रुपयांचे ४४ लोखंडी बेंच तर गांधीबाग-महाल झोनमध्ये २०१४-१५ या आर्थिक वर्षांत ९ लाख ८० हजार रुपये किमतीचे १२० लोखंडी आणि २० सिमेंट बेंच खरेदी केले. सर्वाधिक खरेदी लकडगंज झोनमध्ये करण्यात आली. २०१२-१३, २०१३-१४ आणि २०१४-१५ या तीन वर्षांत जवळपास ८० लाख रुपये मोजून ७५५ लोखंडी आणि ५७० सिमेंट बेंच खरेदी केले. चारही झोनमध्ये बेंच मोठ्या प्रमाणात खरेदी केले, पण त्या बेंचचा हिशेब सध्या नगरसेवकांकडे नसल्यामुळे २०१५-१६ या आर्थिक वर्षांत होणारी बेंचची खरेदी वादात सापडू शकते, असे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.