शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंचलित हवामान केंद्र गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:57 IST

शेतकºयांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा म्हणून राज्य शासनाने महावेध प्रकल्पांतर्गत राज्यभर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देमहत्त्वाची उपकरणे चोरीला मुख्यमंत्र्यांनी केले होते उद्घाटन कसा मिळणार शेतकºयांना अचूक अंदाज

मंगेश व्यवहारे/ मुकेश कुकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकºयांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा म्हणून राज्य शासनाने महावेध प्रकल्पांतर्गत राज्यभर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यातंर्गत ३० एप्रिल २०१७ रोजी बुटीबोरी रोडवर डोंगरगाव येथे पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्राला पाच महिनेही पूर्ण झाले नसताना येथील उपकरण चोरीला गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या केंद्राचे उद्घाटन केले होते, हे विशेष.शेतकºयांना या केंद्राचा लाभ मिळण्याआधिच ते चोरीला गेल्यामुळे अचूक हवामान नोंदणीचे कामच ठप्प पडले आहे. हवामानाचा अचूक अंदाज घेता येत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होऊनही शेतकºयांना शासनाकडूनही मदत मिळत नाही. या दुष्टचक्रातून शेतकºयांना बाहेर काढण्यासाठी शासनाने महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राची स्थापना केली. राज्यात २०५९ व नागपूर जिल्ह्यात ६४ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले. राज्यातील पहिल्या केंद्राची स्थापना नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी रोडवरील डोंगरगाव येथे झाली. ३० एप्रिल २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत केंद्राचे उद्घाटन झाले होते.या केंद्राला लोकमत चमूने सोमवारी भेट दिली असता केंद्रातील सौरपॅनल चोरून नेले होते. हवामानातील घटकांची नोंद घेणाºया यंत्रणेची मोडतोड करून चोरून नेली होती. १२ बाय १२ च्या जागेवर एक खांब उभा होता आणि उद्घाटनाची कोनशिला एवढेच केंद्राच्या स्थळी होते. केंद्राला चारही बाजूने लोखंडी जाळीचे कम्पाऊंड व गेट बसविले आहे. हा संपूर्ण परिसर जंगली गवत व झाडांनी व्यापला आहे. केंद्रात जायलासुद्धा सुरळीत पायवाट नाही.स्कायमेटकडे होती जबाबदारीस्वयंचलित हवामान केंद्राच्या दुरवस्थेसंदर्भात जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, या केंद्राची जबाबदारी ही स्कायमेट या संस्थेकडे होती. स्कायमेटच्या माध्यमातूनच ही यंत्रणा हाताळण्यात येणार होती. पहिल्या स्वयंचलित केंद्राची मोडतोड झाली असली तरी त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी ही स्कायमेटची आहे.पोलिसात तक्रार करणारग्रा.पं.तर्फे तिथे एक लाईटही लावण्यात आला होता. परंतु यंत्रणेसोबतच लाईटही चोरून नेला आहे. याची तक्रार आम्ही पोलिसात करणार आहोत. भविष्यात महत्त्वाच्या यंत्रणेच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकही ठेवू.- देवेंद्र गौर, सरपंच, डोंगरगाव ग्रा.पं.