शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कुठे गेली २० हजार झाडे?

By admin | Updated: August 23, 2015 03:17 IST

उपराजधानीला हिरवे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु वृक्षारोपणाबाबत उदासीनताच आहे.

नासुप्र : कंपनीला नवीन झाडे लावण्याचे निर्देशवसीम कुरैशी  नागपूरउपराजधानीला हिरवे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु वृक्षारोपणाबाबत उदासीनताच आहे. तीन वर्षापूर्वी नासुप्रने शहरात वृक्षारोपण करण्याचे अडीचा कोटीचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले होते. परंतु करारातील शर्तीनुसार या कंपनीने शहरात २० हजार झाडे लावलेली नाही. त्यामुळे नासुप्रने कंपनीला झाडे लावण्याचे निर्देश दिले आहे. नासप्रुने २०१२ मध्ये बीव्हीजी इंडिया कंपनीला शहरात एक लाख झाडे लावण्याचे कंत्राट दिले होते. याची माहिती जाणून घेण्यासाठी नासुप्रने सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सर्वे केला असता कंपनीने करारानुसार शहरात झाडे लावली नसल्याचे निदर्शनास आले. यात अनियमितता आढळून आली असून कोणत्या जातीची किती झाडे लावली याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन किती झाडे लावण्यात आली याचा हिशेब जुळत नाही.शहरातील उद्यान, शाळा, महाविद्यालये, रस्ते, मंदिराचा परिसर यासह सार्वजनिक खुल्या जागेवर झाडे लावण्यात आली होती. परंतु सर्वेक्षणात झाडे कमी असल्याचे निदर्शनास आले. झाडे कमी लावल्याने कंपनीला वृक्षारोपण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तत्कालीन उद्यान अधीक्षकांनी या संदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. झाडे लावण्याचे निर्देशशहरात लावण्यात आलेल्या झाडाचे दीड महिन्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. यात २० हजार झाडे कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे करारानुसार झाडे लावण्याचे निर्देश कंपनीला देण्यात आल्याची माहिती नासुप्रचे अधीक्षक अभियंता एस.एच.गुज्जलवार यांनी दिली.