शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागरचना कधी होणार?

By admin | Updated: July 28, 2016 02:29 IST

केंद्रात व राज्यात सत्तेत असल्याने महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

नागपूर : केंद्रात व राज्यात सत्तेत असल्याने महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काँग्रेससह विरोधकही कामाला लागले आहे. परंतु अद्याप प्रभागाची रचना निश्चित न झाल्याने नगरसेवक संभ्रमात आहेत. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका होणार आहेत. नवीन प्रभागात प्रत्येकी ३५ ते ४० हजार मतदार राहणार आहेत. प्रभागाचे क्षेत्रफळ वाढणार आहे. प्रभागाला कोणता भाग जोडला जाईल, याविषयी अंदाज बांधले जात आहे. संभाव्य प्रभाग विचारात घेऊ न काहींनी जनसंपर्काला सुरुवातही केली आहे. गेल्या निवडणुकीत ७२ प्रभागातून १४५ नगरसेवक निवडून आले होते. यावेळी ३८ प्रभागातून १५१ नगरसेवक निवडून येणार आहेत. एका प्रभागातून चार सदस्य निवडून द्यावयाचे असले तरी पक्षाच्या चार उमेदवारांपैकी सक्षम उमेदवारांवर प्रभागातील निवडणुकीचा कल ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या निवडणुकीत १० अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. यावेळी प्रभागाचे क्षेत्रफळ वाढणार असल्याने अपक्ष नगरसेवक ांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना पक्षाच्या निशाणीचा लाभ होण्याचा अंदाज असला तरी चार उमेदवारांच्या पॅनलमधील सक्षम उमेदवाराचा इतर तीन जणांना लाभ मिळणार आहे. चार सदस्यीय प्रभागात दोन जागा महिलांसाठी राखीव राहणार आहे. काही प्रभागात अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांसाठी एक जागा राखीव असली तरी एका जागेवर ओबीसी वा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत दोन सदस्यीय पद्धती होती. यातील एक जागा महिलांसाठी राखीव असल्याने उरलेली एक जागा काही प्रभागात अनुसूचित जाती, जमातीसाठी राखीव असल्याने अनेक मातब्बरांना निवडणूक लढविता आली नव्हती. यावेळी मात्र त्यांची इच्छा पूर्ण होणार असल्याने अनेक प्रभागातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी) अपक्षांची मनधरणी भाजपने या निवडणुकीत ‘मिशन १००’ घोषणा केली आहे तर ‘अभी नही तो कभी नही’ अशी भूमिका घेत काँग्रेस मैदानात उतरणार आहे. पक्षातील सर्व गट प्रथमच एकत्र आले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागाचे समीकरण कसे राहील याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अनेक प्रभागात अपक्ष नगरसेवकांची भूमिका निर्णायक राहणार असल्याने त्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप व काँग्रेस कामाला लागले आहेत.