शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

जीवघेणे खड्डे बुजविणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : सावनेर-खापा मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ दाेन्ही बाजूला माेठमाेठे खड्डे तयार झाले आहेत. त्यात पावसाचे पाणी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : सावनेर-खापा मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ दाेन्ही बाजूला माेठमाेठे खड्डे तयार झाले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचले आहे. वाहनचालकांना याच खड्ड्यांमधून मार्गक्रमण करावे लागते. हे खड्डे अपघातांना कारणीभूत ठरत असून, ते बुजविणार कधी, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे. याकडे नगरपालिकेचा बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.

सावनेर शहरातून नागपूर-छिंदवाडा (मध्य प्रदेश) ही रेल्वे लाईन गेली आहे. ही रेल्वे लाईन सावनेर-खापा मार्गाला छेदून गेल्याने शहरातील पंचशीलनगरात रेल्वे फाटक तयार केले आहे. या फाटकाच्या दाेन्ही बाजूला माेठमाेठे खड्डे तयार झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचले आहे. या खड्ड्यांमधून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकी वाहने स्लीप हाेऊ अपघात घडतात, तर खड्ड्यांमधून वाहन गेल्याने वाहनांचे नुकसानही हाेते. खड्ड्यांमधून वाहन जात असल्याने शरीराला धक्के लागतात आणि त्यातून नागरिकांना पाठ, कंबर व मणक्याचा त्रास उद्भवताे, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली.

या मार्गाची देखभाल व दुरुस्ती जबाबदारी ही स्थानिक नगरपालिका प्रशासनाची आहे. या खड्ड्यांमुळे हाेणाऱ्या त्रासाबाबत पालिका प्रशासनाला इत्थंभूत माहिती आहे. मात्र, हे खड्डे बुजविण्यासाठी कुणीही पुढाकार घ्यायला तयार नाही. परिणामी, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने हे खड्डे व्यवस्थित बुजवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

...

चिखलामुळे मनस्ताप

खड्ड्यामधील पाणी व राेडलगतची व वाहनांच्या चाकांची माती यामुळे या परिसरात माेठ्या प्रमाणात चिखल तयार झाला आहे. या चिखलामुळे दुचाकी वाहने घसरून अपघात हाेत आहेत. शिवाय, माेठ्या वाहनांच्या चाकांमुळे चिखल व डबक्यांमधील पाणी दुचाकीचालकांसह इतरांच्या अंगावर उडत असल्याने कपडे खराब हाेतात. त्यामुळे अनेकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागताे.