शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:12 IST

नरखेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका नरखेड तालुक्याला बसला. ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी ऑक्सिजनची पर्याप्त ...

नरखेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका नरखेड तालुक्याला बसला. ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी ऑक्सिजनची पर्याप्त सुविधा नसल्याने अनेकांचा मृत्यू झाला. आजही ते प्रसंग आठवल्यावर अनेकांच्या अंगावर काटा येतो. दुसऱ्या लाटेपासून धडा घेत कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी व गतवेळसारखी परस्थिती निर्माण झाल्यास रुग्णांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने तालुकास्तरावर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी स्थानिक आमदारांनी कोविड उपाययोजनेसाठी निधीही उपलब्ध करून दिला होता. कोविड आढावा बैठकीत तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नरखेड येथे सीएसआर फंडातून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली होती तसेच लवकरच या प्रकल्पाचे निर्माण कार्य सुरू होणार आहे, असे सांगितले होते. स्थानिक आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयाला कोरोना रुग्णासाठी ५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करून त्याचबरोबर ऑक्सिजन स्टोरेज टँक निर्माण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार येथे ५० ऑक्सिजन बेडतर मिळाले. मात्र, ९ महिन्यांचा कालावधी संपल्यानंतरही ना ऑक्सिजन प्रकल्प तयार झाला ना ऑक्सिजन स्टोरेज टँक निर्माण झाला. ऑक्सिजन प्रकल्पाची फाईल तर अद्यापही जिल्ह्यातून तहसीलकडे निघालीच नाही. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रशासन किती सजग आहे, हे यावरून दिसून येते.

३५ नागरिकांचा गेला जीव.

२० महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या कोविड संक्रमाणामुळे पहिल्या लाटेत नरखेड शहरातील २७१ व दुसऱ्या लाटेत ९५७ नागरिक संक्रमित झाले होते. त्यामध्ये पहिल्या लाटेत ५ तर दुसऱ्या लाटेत ३० अशा ३५ नागरिकांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या लाटेत शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये सर्वांत जास्त मृत्यू ऑक्सिजनच्या अभावामुळेच झाले. दुसऱ्या लाटेच्या संक्रमणाची स्थिती पाहता रुग्णांना वाचविण्यासाठी सामाजिक स्तरांतून नागरिकांच्या सहकार्याने, विभिन्न राजकीय पक्ष तसेच शासनाकडून एकूण २५ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन, आवश्यक औषधी, उपकरण, बेड, मास्क, रेमडिसिवार इंजेक्शन ग्रामीण रुग्णालयाला देण्यात आल्या होत्या. त्याचा रुग्णांना लाभ तर झालाच परंतू रुग्णालयाच्या निष्काळजी पणामुळे तीन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन बंद पडल्या आहेत. पुढील काळात ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनची गरज पडल्यास किती मशीन कामात येईल हे काळच सांगेल. भविष्यात ऑक्सिजन गरज लक्षात घेता ९० जम्बो सिलिंडर उपलब्ध करण्यात आले. त्यापैकी ३० सिलिंडर भरले आहेत.

-

नरखेड शहरात ९० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. पुढील महिन्यापर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात येईल. रुग्णालयात कर्मचाऱ्याच्या कमतरता असून सध्या सुरू असलेल्या साथीच्या आजारामुळे रुग्णालयात गर्दी दिसून येते. या आजाराच्या उपचारांबरोबर नागरिकांनी कोविड टेस्ट करून घ्यावी. यासोबतच कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे.

- डॉ. दत्तात्रय वनकडस

आरोग्य अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय