शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील कोट्यवधीचे सौर संयंत्र कधी होणार प्रकाशमय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 21:06 IST

जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वसतिगृहात सौर संयंत्र लावून त्या प्रकाशमान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़

ठळक मुद्देएकही काम मार्गी नाही : शाळा, अंगणवाड्या, वसतिगृह, आरोग्य केंद्रांतील स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वसतिगृहात सौर संयंत्र लावून त्या प्रकाशमान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ यासाठी कोट्यवधी रुपयांच्या कामाचे प्रस्ताव मेडा (सौरऊर्जा अभिकरण) या शासनाच्या एजन्सीकडे पाठविण्यात आले़ तसा निधीही डीसीपी व खनिकर्म विकास प्रतिष्ठानने दिला़ या सर्व प्रक्रियेला वर्ष लोटत असताना कुठलेही काम मेडाने पूर्ण केले नाही़शिक्षण विभागांतर्गत ४ कोटी ३० लाखांचे सौर संयंत्र प्राथमिक शाळांत लागणार होते़ ३०० च्या वर शाळा प्रकाशमान होणार होत्या. ज्या शाळांची देयके प्रलंबित आहेत, तिथे सौर संयंत्र लावण्याचे पूर्वी ठरविण्यात आले होते़ परंतु, मेडाच्या आग्रही मागणीमुळे ज्या शाळेवर वीज बिलाची थकबाकी नाही, अशांचा प्रस्ताव करून तो नव्याने सादर करावा लागला होता़ याच पद्धतीने महिला बालकल्याण विभागाने १५५ अंगणवाड्या सोलरवर करण्याचा निर्णय घेतला, वर्षभरापासून प्रक्रिया सुरू आहे. यासाठीचा निधीही मेडाला हस्तांतरित केला आहे. आरोग्य विभाग आणि समाजकल्याण विभागानेसुद्धा डीपीसी आणि खनिकर्म विकास प्रतिष्ठानने निधी उप्लब्ध करून दिल्यानंतर तत्काळ प्रस्ताव मेडाला पाठविला होता़ हा प्रकल्प राबविण्यासाठी जिल्हा परिषदेला अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागली़ तशा सूचनाही कनिष्ठ यंत्रणांना आल्या़ हे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे़ मात्र, हातात काहीही पदरात आले नाही़ त्यामुळे ही योजनाच फसली असल्याचे आता या कामाच्या मंदगतीवरून पुढे येत आहे़कंत्राटदारांचीच ‘लॉबिंग’जिल्हा परिषदेची कोट्यवधींची कामे मेडा या शासनाच्या एजन्सीकडे देण्यात आली़ या ठिकाणी सहा कंत्राटदार पॅनलवर असल्याची माहिती आहे़ ही सहाच मंडळी ‘ऑल इज वेल’ करून दुसऱ्या कुणालाही कामांचे कंत्राट मिळू देत नाही़ बाहेरच्या कंत्राटदाराने सहभागी होण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडण्यात येतो, अशीही चर्चा आहे़

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाelectricityवीज