शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

मातामृत्यू शून्यावर येणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 01:59 IST

सशक्त पिढी निर्माणासाठी आई सशक्त होणे, ही काळाची गरज आहे. माता मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्याचा आरोग्य

पूर्व विदर्भात प्रमाण वाढीस : आॅडिट’बाबत उदासिनताचसुमेध वाघमारे/ योगेश पांडे ल्ल नागपूरसशक्त पिढी निर्माणासाठी आई सशक्त होणे, ही काळाची गरज आहे. माता मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्याचा आरोग्य विभाग प्रयत्नशील असला तरी पाहिजे त्याप्रमाणात अद्यापही यश आलेले दिसून येत नाही. विशेषत: नागपूर विभागामधील सहा जिल्हे मिळून २०११-१२ मध्ये मातामृत्यूची संख्या २३९ होती, ती २०१५-१६मध्ये २५६ वर गेली आहे. यात वर्धा व नागपूर जिल्हा आघाडीवर असल्याचे वास्तव आहे. मातामृत्यूच्या ‘आॅडिट’बाबत शासकीय पातळीवर उदासिनताच असल्याचे दिसून येत आहे. अशास्थितीत मातामृत्यूचा दर शून्यावर कधी व कसा येणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.शासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्या माध्यमातून कोट्यवधींच्या योजनांचा पाऊस पाडला जातो. परंतु, हलगर्जीपणासोबतच गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, एनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत यामुळे प्रसूतीच्या वेळी मातांचे मृत्यू होत आहेत, हे कटू सत्य नाकारता येत नाही.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागपूर उपसंचालक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०११-१२ मध्ये भंडारा जिल्ह्यात १८, गोंदियात १७, चंद्रपुरात ३२, गडचिरोलीत ३१, वर्धेत १५, नागपूर जिल्ह्यात ९, नागपूर शहरात ११७ असे मिळून नागपूर सर्कलमध्ये २३९ मातामृत्यूची नोंद आहे. मातामृत्यूचे ‘आॅडिट’ आवश्यकप्रसिद्ध स्त्रीरोग प्रसुती तज्ज्ञ डॉ. नोझेर शेरियार या म्हणाल्या, महाराष्ट्रात प्रसूत होणाऱ्या एक लाख महिलांपैकी १०६ माता दगावतात. तामिळनाडूमध्ये हे प्रमाण ९७ तर केरळमध्ये ८१ आहे. केरळचा पॅटर्न आपल्याकडे लागू करायचा असेल तर आरोग्यसाठी स्वतंत्र कॅडर निर्माण होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, याचे ‘डेथ आॅडिट’ होऊन व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे महत्त्वाचे आहे. असे झाल्यास जास्तीत जास्त मातांचे प्राण वाचविले जाऊ शकतील. ग्रामीण भागात आजही घरी प्रसूत होण्याचे प्रमाण मोठे आहे. असुरक्षित गर्भपातमुळेही माता मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. माता मृत्यूची खरी कारणे समोर आणण्यासाठी पारदर्शकपणे ‘डेथ आॅडिट ’ होणे आवश्यक आहे. अनेक पाश्चात्त्य देशांनी आपल्या आरोग्य धोरणांत बालके आणि गरोदर मातांना प्राधान्य दिले आहे.