शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील २५० हॉस्पिटलचे ऑडिट कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अलीकडच्या काळात नागपूर शहराची मध्य भारतातील ‘वैद्यकीय हब’ अशी ओळख झाली आहे. नागपूर शहरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अलीकडच्या काळात नागपूर शहराची मध्य भारतातील ‘वैद्यकीय हब’ अशी ओळख झाली आहे. नागपूर शहरात लहान-मोठे ६५० हॉस्पिटल्स आहेत. यातील मोठ्या २५० हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे आहे. परंतु यातील अनेक हॉस्पिटलमध्ये ‘फिक्स फायर इन्स्टॉलेशन सिस्टिम’ नाही. रुग्णांच्या जीविताचा विचार करता या हॉस्पिटलचे ऑडिट कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खबरदारी म्हणून शहरातील ८० इमारतींचे दर महिन्याला अग्निशमन विभागाकडून ऑडिट केले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन व केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सध्या शहरातील हॉस्पिटल्सचे अग्निशमन विभागामार्फत ऑडिट सुरू आहे. अग्निशमन यंत्रणा असेल तरच नवीन हॉस्पिटलला परवानगी दिली जाते. अशी विभागाकडून देण्यात आली. परंतु हॉस्पिटलची संख्या विचारात घेता यासाठी स्वतंत्र ऑडिट करण्याची गरज आहे.

उंच इमारती व हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा लावणे अत्यंत गरजेचे आहे. ‘फिक्स फायर इन्स्टॉलेशन सिस्टिम’ असल्याशिवाय हॉस्पिटलला अग्निशमन विभागाकडून परवानगी दिली जात नाही. मात्र, शहरातील अनेक हॉस्पिटल्सचे प्रवेश अत्यंत अरुंद आहेत. त्यामुळे कुठलीही घटना घडल्यास या ठिकाणाहून लोकांना बाहेर काढणे कठीण होऊ शकते, अशी स्थिती आहे, तर काही हॉस्पिटलमध्ये आग लागल्यावर रुग्णांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेला रॅम्प नाही. तेथे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

नागपूर शहरातील मेयो, मेडिकल रुग्णालयांचे बांधकाम जुने असून प्रशस्त जागेत आहे. येथे फर्निचरचाही फारसा वापर नाही. मात्र, धंतोली, रामदास पेठ यासारख्या भागांतील अनेक खासगी रुग्णालयांचे बांधकाम कमी जागेत करण्यात आले आहे.

नागपुरात ६५० हॉस्पिटल्स व नर्सिंग होम आहेत. यातील १५० हॉस्पिटल्स मोठ्या आस्थापनांच्या प्रकारात मोडतात. १५ मीटरपेक्षा उंच इमारतींचा यात समावेश आहे. अग्निशमन यंत्रणेच्या संदर्भात विभागातर्फे दरवर्षी शहरातील इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. यात त्रुटी आढळून आल्यास संबंधितांना नोटीस बजावून यंत्रणा उभारण्यास सांगितले जाते. त्यानंतरही उपाययोजना न केल्यास वीज व पाणीपुरवठा खंडित करून इमारतीला असुरक्षित घोषित केले जाते. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, शहरातील हॉस्पिटल्सचे ऑडिट सुरू असल्याची माहिती मनपाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी चंदनखेडे यांनी दिली.

...

दर महिन्याला ८० इमारतींचे ऑडिट

शहरातील इमारती व हॉस्पिटल्समध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली अग्निशमन यंत्रणा आहे की नाही यासाठी दर महिन्याला ८० इमारतींचे ऑडिट केले जाते. आवश्यक असलेल्या उपाययोजनांची चाचपणी केली जाते. त्रुटी आढल्यास त्यांना सुरक्षेच्या उपाययोजनांबद्दल सांगण्यात येते. न केल्यास कारवाई केली जाते.

राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा

...

पूर्तता प्रमाणपत्र आवश्यक

हॉस्पिटलला नाहरकत प्रमाणपत्र दिल्यानतंर पूर्तता प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. अग्निशमन उपाययोजना न करणाऱ्या हॉस्पिटल व्यवस्थापनांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येते. त्यानंतरही उपाययोजना न करणाऱ्या इस्पितळांना धोकादायक घोषित केले जाते.

...