शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

जिल्हा न्यायालयाची लिफ्ट बंद पडते तेव्हा...

By admin | Updated: July 2, 2016 03:08 IST

जिल्हा न्यायालयात शुक्रवारी अचानक तासभर वीज पुरवठा खंडित झाला होता. परिणामी वकिलांसह

अनेकांची तारांबळ : तासभर वीज बेपत्तानागपूर : जिल्हा न्यायालयात शुक्रवारी अचानक तासभर वीज पुरवठा खंडित झाला होता. परिणामी वकिलांसह अनेक जण वेगवेगळ्या लिफ्टमध्ये अडकले होते तसेच न्यायालयांचे कामकाजही ठप्प झाले होते. दरम्यान न्यायमंदिर आणि दगडी इमारतीतील वीज पुरवठा गेल्या एक महिन्यापासून वारंवार खंडित होत असल्याच्या कृत्याचा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल यांनी निषेध केला आहे.आज दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास न्यायमंदिर इमारतीतील वीज अचानक खंडित होताच चार ठिकाणी सुरू असलेल्या लिफ्टमध्ये वकील,पक्षकार, कर्मचारी, पोलीस जवान आणि आरोपी अडकले होते. त्यापैकी काही ज्येष्ठ वकील होते. न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीच आठवा मजला गाठून विशिष्ट व्हिलच्या मदतीने त्यांची सुटका केली. यासाठी बराच विलंब लागल्याने काहींचा श्वास गुदमरला होता.वीज खंडित झाल्याने न्यायालयीन कामकाजही ठप्प झाले होते. तब्बल तासभराच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर वीज पुरवठा सुरळीत झाला होता. वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना गेल्या एक महिन्यापासून वाढल्या आहेत. ऐन उकाड्याच्या दिवसात हा प्रकार घडत असल्याने सर्वांचेच अतोनात बेहाल होत आहेत. वकील, न्यायाधीश, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये महावितरणने न्यायालयांमधील वीज पुरवठा खंडित न होण्याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे, असे निवाडे दिलेले आहेत. तरीही वीज खंडित होण्याचा प्रकार थांबत नसल्याने या कृतीचा डीबीएने निषेध केला आहे. हा प्रकार कोणत्याही स्थितीत सहन केला जाणार नाही. संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशाराही देण्यात आला. (प्रतिनिधी)