शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

डीजेवाले बाबू भीक मागतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 01:24 IST

नागपुरात डीजेवाले बाबू गाना बजाव असे म्हटले तर यापुढे डीजेवाले गाणे वाजविणार नाहीत. कारण शासनाने त्यांच्या व्यवसायावरच बंदी आणली आहे.

ठळक मुद्देव्यवसायावर बंदी : सरकारचे लक्ष वेधले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात डीजेवाले बाबू गाना बजाव असे म्हटले तर यापुढे डीजेवाले गाणे वाजविणार नाहीत. कारण शासनाने त्यांच्या व्यवसायावरच बंदी आणली आहे. त्यामुळे बेरोजगार झालेल्या डीजे व्यावसायिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात भीक मांगो आंदोलन केले. भीक मागून जमविलेला निधी उपजिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री निधीत गोळा करण्यात आला.सरकारने डीजे व्यावसायिकांवर बंदी आणल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध शहरातील शेकडो डीजे व्यावसायिकांनी आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात भीक मांगो आंदोलन केले. आंदोलकांनी झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, संविधान चौक या मार्गाने भव्य मोर्चा काढून दुचाकी, चारचाकी वाहनचालक, फुटपाथ दुकानदारांना भीक मागितली. यावेळी शासनाच्या विरुद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली. डीजेवर बंदी घातल्यामुळे गणेशोत्सव, दुर्गोत्सव, लग्नसमारंभ, वाढदिवस आदी उत्सवावर विरजण पडल्याची भावना संतप्त आंदोलकांनी व्यक्त केली. संविधान चौकात आमदार प्रकाश गजभिये यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात गोरगरीब जनतेला व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करण्यात कुठलीच अडचण येत नव्हती. परंतु विद्यमान सरकारच्या काळात व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला. भीक मांगो आंदोलनातून एकूण ४,१४७ रुपये गोळा करण्यात आले. हा निधी विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री निधीत गोळा करण्यासाठी आंदोलक गेले असता, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निधी गोळा करण्याची सूचना केली. त्यावर उपजिल्हाधिकारी पडोळे यांच्यामार्फत हा निधी मुख्यमंत्री निधीत गोळा करण्यात आला. आंदोलनात शहरातील जवळपास ५०० डीजे व्यावसायिकांसह विदर्भ बॅक स्टेज असोसिएशनचे अध्यक्ष संदीप बारस्कर, पम्मी भत्ती, राष्ट्रवादी काँंग्रेसचे विजय गजभिये, अमोल मौंदेकर, निखील कामडे, रविकांत पवनीपगार, विनायक मानकर, नितीन अन्नपूर्णे, दलजित शाह, अभिजित वाळके, रोशन बिरहा, वैभव शेंडे, दीपक नितनवरे, रोशन गिरी, प्रवीण बोकडे, नीतेश मानकर, मदन पाटील, दिनेश वानखेडे, राकेश राऊत, रामू नायडू आदी सहभागी झाले होते.