शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात १८ ते ४५ वर्षे वयोगटांचे लसीकरण कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:08 IST

जलालखेडा : राज्यात १ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील नागरिकांचे मोफत लसीकरण केल्या जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ...

जलालखेडा : राज्यात १ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील नागरिकांचे मोफत लसीकरण केल्या जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यासाठी अ‍ॅपवर २८ एप्रिलपासून नोंदणीला सुरुवात करण्यात आली होती. अ‍ॅपवर नोंदणी केल्याशिवाय लसीकरण होणार नाही, असे शासनाकडून निर्देश देण्यात आले होते. दिलेल्या निर्देशानुसार नागरिकांनी नोंदणी करायला सुरुवात केली होती. शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात युवकवर्गांनी नोंदणी केली होती. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नागरिकांजवळ अँड्रॉइड मोबाइल नसताना, त्यांनी इतरांच्या मोबाइलचा वापर करून लसीकरणासाठी नोंदणी केली होती. नोंदणी करून आठ दिवस उलटूनही त्यांना अजूनपर्यंत लस मिळालेली नाही. अजूनपर्यंत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झालेले नाही. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात फक्त तालुका स्तरावर तीनच ठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मोजक्याच नागरिकांचे लसीकरण त्या केंद्रवार केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना कधीपर्यंत लसीकरणासाठी वाट पाहावी लागणार आहे, हे सांगता येत नाही. लसीचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू करता येत नाही, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. मग व्यवस्था नव्हती, तर सरकारने घोषणा कशासाठी केली, असा सवाल ग्रामीण भागातील युवकाकडून विचारला जात आहे.

---

नरखेड तालुक्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले नाही. काटोल येथे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. जलालखेडा हे गाव काटोल ते वरुड या मुख्य रस्त्यावर असून, येथे १८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करायला हरकत नाही. येथे ४५ च्या वरील वयोगटांतील नागरिकांसाठी लसीकरण सुरू आहे. लसीचा पुरवठा व्यवस्थित झाल्यास १८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण शक्य आहे.

- प्रशांत वैखंडे

तालुका आरोग्य अधिकारी, नरखेड.

---

२८ एप्रिलला अ‍ॅपवर नोंद केली. माझे अद्याप लसीकरण झालेले नाही. ७ मे रोजी अ‍ॅप पाहिला तर काटोल येथे लसीकरण केंद्र सुरू असल्याचे दिसले. त्यानुसार, मी काटोल येथील केंद्र निवडले. शुक्रवारी काटोल येथे जाऊन लस घेतली. ग्रामीण भागातील युवकांना ही सुविधा गावातच उपलब्ध होणे गरजेचे आहे.

- योगेश जाणे, मदना.