शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

'न्यायमूर्तींना व्हाॅटस्ॲप'चा चौकशी अहवाल न्यायालयात सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:07 IST

नागपूर : 'न्यायमूर्तींना व्हाॅटस्ॲप मॅसेज' प्रकरणाचा चौकशी अहवाल शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला. अहवाल गोपनीय ...

नागपूर : 'न्यायमूर्तींना व्हाॅटस्ॲप मॅसेज' प्रकरणाचा चौकशी अहवाल शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला. अहवाल गोपनीय ठेवण्यात आला. न्यायमूर्ती रोहित देव यांनी अहवाल पडताळून यावरील पुढील आदेश राखून ठेवला. त्यामुळे या प्रकरणात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या बाबतीत न्यायमूर्तींना प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे अतिशय गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. असे असताना एका व्यक्तीने गेल्या शुक्रवारी भूखंड हडपण्याच्या प्रकरणातील आरोपी अमरिंदरसिंग हरमिंदरसिंग बग्गाला जामीन नाकारला जावा याकरिता न्यायमूर्ती देव यांना व्हाॅटस्ॲप मॅसेज पाठवला. न्या. देव यांनी या अवैध कृतीची लगेच गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या न्यायिक व्यवस्थापकांना सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा व ५ मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता.

------------------

बग्गाचा जामीन अर्ज फेटाळला

१, २ व ३ मार्च रोजी आर्थिक गुन्हे विभागात हजर राहण्याच्या निर्देशाचे पालन केले नाही म्हणून, बग्गाचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. १ ऑक्टोबर २०२० रोजी वाठोडा पोलिसांनी तवरलाल छाबरानी यांच्या तक्रारीवरून बग्गा व इतर काही आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. आदिवासी समाज उन्नती गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या ले-आऊटमधील ५१७६ चौरस फूटाच्या भूखंडाचा हा वाद आहे. सरकारच्यावतीने ॲड. नितीन रोडे यांनी कामकाज पाहिले.