शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

रामटेकच्या पुढे रेल्वे जाणार काय?

By admin | Updated: December 30, 2014 00:54 IST

कोळसा, मॅगनिज, डोलामाईट यासारख्या खनिजाची वाहतूक करण्यासाठी इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूर - रामटेक रेल्वे सुरू केली. मात्र स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही ही रेल्वे लाईन पुढे गेली नाही.

दीपक गिरधर - रामटेककोळसा, मॅगनिज, डोलामाईट यासारख्या खनिजाची वाहतूक करण्यासाठी इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूर - रामटेक रेल्वे सुरू केली. मात्र स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही ही रेल्वे लाईन पुढे गेली नाही. परिणामी रामटेकचा पर्यटनाच्या बाबतीत पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही. केवळ १५ किमी तारसापर्यंत रेल्वेरुळ जोडल्यास रामटेकला महत्त्व मिळू शकते. परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने विस्तारीकरण झाले नाही. रामटेक परिसर हा खनिज संपदेने आणि निसर्ग सौंदर्याने समृद्ध असा आहे. या तालुक्यातील मनसर आणि नगरधन भागात मॅगनिजच्या खाणी आहेत. कन्हान, गोंडेगाव या भागात विपूल प्रमाणात दगडी कोळसा आहे. देवलापारच्या जंगली भागात मोठ्या प्रमाणात डोलामाईट आणि बॉक्साईट आढळते. या खनिज संपदेवर डोळा ठेवून स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी नागपूर-रामटेक रेल्वे सुरू केली. रामटेकच्या निसर्ग सौंदर्यावर इंग्रज अधिकारी जाम खूश होते. त्यामुळेच सुटीचा काळ ते रामटेक आणि शेजारच्या जंगली भागात येऊन घालवायचे, असा इतिहास सापडतो. त्यासाठी ते रेल्वेचा वापर करायचे. त्याकाळी इंग्रजांसाठी रेल्वेची कदाचित तेवढीच उपयुक्तता असेल. अलीकडे रामटेक हे पर्यटनाच्या नकाशावर आलेले राज्यातील प्रमुख ठिकाण आहे. येथील निसर्ग सगळ्यांनाच भुरळ घालतो. धार्मिक, सांस्कृतिक, इको-टुरिझम अशा सर्वच प्रकारचे पर्यटन एकाच ठिकाणी मिळेल असे रामटेक हे देशातील एकमेव केंद्र आहे. देश - विदेशातील पर्यटक म्हणूनच रामटेककडे आकर्षित होतात. रामटेकजवळील मनसरच्या उत्खननाबाबत इंग्लंडमधील हंस बेकर या उत्खनन तज्ज्ञाने अहवाल सादर केला आहे. महाकवी कालिदासांनी रामगिरीवर ‘मेघदूत’ हे अजरामर काव्य लिहिले. त्यामुळे राज्यातील मुख्य अशी साहित्यभूमीसुद्धा आहे. इतकी वैशिष्ट्ये एकाच ठिकाणी असणारे रामटेक हे म्हणूनच विरळे आहे. पर्यटकांना रामटेकला येणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. रामटेक रेल्वेचे विस्तारीकरण झाल्यास मुंबईपासून कोलकात्यापर्यंतची वाहतूक रामटेकमार्गे वळविली जाऊ शकते. यासाठी रामटेकपासून केवळ १५ किमी अंतरावर असलेल्या तारसापर्यंत रेल्वे टॅ्रक टाकावा लागणार आहे. रामटेक आणि परिसराची ही गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. रामटेकच्या विस्तारीकरणाबाबत गोटेगावपर्यंत सर्व्हेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु सर्वेक्षण झालेच नाही. मुकुल वासनिक रामटेकचे खासदार असताना या विस्तारीकरणाच्या चर्चांना वेग आला होता. त्या चर्चाही आता शांत झाल्या. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी अद्याप तरी रामटेकसाठी काहीही केले नाही. विरोधाच्या लाटेवर स्वार होऊन ते लोकसभेत पोहोचले, म्हणून त्यांनी काहीच करू नये असे नाही. रामटेक रेल्वेच्या विस्तारीकरणाचा आवाज त्यांनी बुलंद करणे आवश्यक आहे. कर्मधर्म संयोगाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे महाराष्ट्राचेच असल्याने निश्चित या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. आर. डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनीदेखील रामटेक रेल्वे विस्तारीकरणाचा प्रश्न उचलून धरावा, अशी इथल्या नागरिकांची अपेक्षा आहे.