शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

आमीर खानचा दोष काय?

By admin | Updated: November 26, 2015 03:17 IST

देशात असहिष्णुता वाढल्यामुळे आपली पत्नी किरण देश सोडून जाण्याच्या विचारात असल्याच्या सुपरस्टार आमीर खान याच्या वक्तव्यामुळे रान पेटले असताना ....

मा.गो.वैद्य यांच्याकडून पाठराखण : संघ पदाधिकाऱ्यांचे मात्र मौननागपूर : देशात असहिष्णुता वाढल्यामुळे आपली पत्नी किरण देश सोडून जाण्याच्या विचारात असल्याच्या सुपरस्टार आमीर खान याच्या वक्तव्यामुळे रान पेटले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यावर मौन साधले आहे. परंतु दुसरीकडे संघाचे ज्येष्ठ विचारक मा.गो.वैद्य यांनी मात्र आमीर खानची पाठराखण केली आहे. संबंधित मत हे आमीर खानचे नव्हते, मग त्याला दोषी का ठरविण्यात येत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.देशभरात आमीर खान समर्थक विरुद्ध विरोधक अशी बाजू तापली होती. विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारी नागपुरातच आमीर खानवर जोरदार टीका करत त्याच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर संघाकडून याची काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता होती. परंतु संघ पदाधिकाऱ्यांनी याबाबत मौन राखले आहे. मा.गो.वैद्य यांनी मात्र आमीर खानची बाजू उचलून धरली. मुळात या प्रकरणात आमीर खानचा दोष नाही. त्याच्या मनात देश सोडून जावे असे आलेले नाही. त्याच्या पत्नीच्या मनात असे विचार आले होते. त्याने त्याच्या पत्नीला याबाबत विचारणा करायला हवी. आपल्याहून अधिक सहिष्णुता असलेल्या देशाचे नाव त्याची पत्नी सांगू शकणार नाही, कारण भारतासारखा सहिष्णुता असलेला कुठलाही देश नाही, असे मत मा.गो.वैद्य यांनी व्यक्त केले. वैद्य यांच्या या भूमिकेवर संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)लहान गोष्टीला मोठे करण्याची गरज नाहीदेशात असहिष्णूतेच्या मुद्यावरून जो वाद सुरू आहे तो एका कारस्थानाचा भाग असल्याचा आरोप मा.गो.वैद्य यांनी केला. देशात लहान गोष्टींना फार मोठे करण्यात येत आहे. असे करण्याची आवश्यकता नाही. साहित्यिकांनी एकत्र पुरस्कार परत केले नाही. तर बिहार निवडणूकीच्या काळात महिनाभर हा क्रम सुरू होता. यातूनच हे षड्यंत्र असल्याचे वाटत आहे. यात साहित्यिकांसोबतच चित्रपट कलाकारांचादेखील सहभाग आहे असे ते म्हणाले.