शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत कलह कशासाठी?

By admin | Updated: February 10, 2016 03:26 IST

नेमका याच संधीचा फायदा घेत विद्यापीठाने प्रकाशित केलेली निर्देश २८/२०१२ नुसारची जाहिरात चुकीची आहे.

नागपूर : नेमका याच संधीचा फायदा घेत विद्यापीठाने प्रकाशित केलेली निर्देश २८/२०१२ नुसारची जाहिरात चुकीची आहे. यात विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरविलेल्या निर्देशांचे पालन झाले नाही, असे तांत्रिक कारण छाननी समितीने उमेदवारी अर्ज अवैध ठरलेल्या विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या एका कंपूकडून पुढे रेटण्यात आली. मात्र पदभरती संदर्भात विद्यापीठातील तज्ज्ञ मंडळी आणि अधिकाऱ्यांनी कायद्याचा आधार घेत निर्देश निश्चित केले होते. यास व्यवस्थापन परिषदेची मान्यता होती. यानंतरच कुलगुरू डॉ.सपकाळ यांच्या मान्यतेनंतर जाहिरात प्रकाशित झाली होती. यावर काही एक चर्चा न करता दबाब गटांचा आधार घेत पदभरती कशी लांबविता येईल, याकडे या कंपनीचा भर होता. यात ते यशस्वी ठरले. प्रभारी कुलगुरू अनुपकुमार प्रशासकीय सेवेतील असल्याने चुकीचे काम ते खपवून घेणार नाही, अशी कल्पनाही त्यांना होती. मात्र अनुपकुमार यांच्यानंतर दुसरे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्या कार्यकाळात पदभरतीचे दिर्शानिर्देश बदलविण्याच्या कामाला अधिक वेग आला. १८ आॅक्टोबर २०१२ रोजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत यावरून मतभेद झाले. यात दबावगटाला यश आले. त्यावेळचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.डी.के.अग्रवाल ( सध्या महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक) यांच्या अध्यक्षतेत निर्देश क्रमांक २८/२०१२ मध्ये मुद्रण दुरुस्ती आणि इतर आवश्यक दुरुस्तीसाठी समिती स्थापन करण्यात आली. अग्रवाल समितीच्या शिफारशीनुसार शिक्षकेतर पदाच्या पदभरतीसंदर्भात सुधारित निर्देश क्रमांक २७/२०१४ ला तत्कालीन कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे यांनी मान्यता दिली. पुढे कायद्याचा पेच, पदभरती निर्देश क्रमांक २८/२०१२ नुसार घ्यायची की २७/२०१४ नुसार, यासाठी विद्यापीठातील दोन्ही गटात निर्माण झालेला कलह यात पदभरतीची फाईल बंद झाली. यात पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या बेरोजगार उमेदवारांचा दोष काय ?( उद्याच्या अंकात : तीन वर्षांत तीन तेरा )