शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

रामगिरीवर मुख्यमंत्र्यांचे स्वागत

By admin | Updated: December 31, 2016 03:06 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय दिले आणि नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त केल्याबद्दल

ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय दिल्याबद्दल व एनआयटी बरखास्त केल्याबद्दल मानले आभार नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय दिले आणि नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त केल्याबद्दल शुक्रवारी रामगिरी या शासकीय निवासस्थानी हजारो नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी महापौर प्रवीण दटके, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नानाभाऊ उमाठे, संदीप जोशी, बळवंत जिचकार, डॉ. कल्पना पांडे, नंदाताई जिचकार, मोहन मते, गोपाल बेहरे, गिरीश देशमुख, जयप्रकाश गुप्ता, विजय महतकर, विवेक तरासे, मीनाताई तिडके, कीर्ती अजमेरा, ओंकारेश्वर गुरव, रमेश चोपडे आदी पदाधिकारी, नगरसेवक तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मिळावे ही अनेक वर्षांपासून मागणी होती. परंतु त्यांना न्याय मिळत नव्हता. निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला स्वतंत्र मंत्रालय देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार दिलेले आश्वासन पूर्ण केले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस म्हणाले की, मंत्रालय निर्माण करणे ही पहिली पायरी असून या मंत्रालयाचा विकास करुन ओबीसीतील सर्व घटकांपर्यंत विकास पोहचविण्याचे काम या मंत्रालयाच्या माध्यमातून करण्यात येईल. नागपूर सुधार प्रन्यास संदर्भातही अनेकांनी आश्वासने दिलीत. परंतु कुणीही एनआयटी बरखास्त केली नाही. नागपूर शहरातील जनतेच्या अपेक्षेनुसार एकाच शहरात दोन विकास संस्था नकोत, आता नागपूर शहरासाठी मेट्रो रिजन अथॉरिटी तयार झाली आहे. त्यामुळे नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करून विकासाची संपूर्ण जबाबदारी नागपूर महानगरपालिकेची राहणार आहे. बाहेरचा विकास मेट्रो रिजन करणार असल्यामुळे जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचे काम करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी सांगितले. आ. सुधाकर कोहळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचे पुष्पहार घालून तसेच पेढा भरवून स्वागत केले. तसेच ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नानाभाऊ उमाठे यांनीही ओबीसीसाठी मंत्रालय स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.(प्रतिनिधी)