शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

आरोग्य विभागावर विजेचा भार

By admin | Updated: December 4, 2015 03:25 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालये, आयुर्वेदिक रुग्णालये कार्यरत आहे.

व्यावसायिक मीटरमुळे झाले बेजार : महावितरणकडूनही बेदखलनागपूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालये, आयुर्वेदिक रुग्णालये कार्यरत आहे. यामाध्यमातून ग्रामिण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा पुरविल्या जाते. जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या या विभागाला महावितरणने चांगलेच बेजार केले आहे. व्यावसायिक वीज दराची आकारणी केंद्राकडून करण्यात येत असल्याने आरोग्य विभागावर अतिरिक्त विजेचा भार पडतो आहे. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामिण भागात ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३१६ उपकेंद्र, २९ अ‍ॅलोपॅथिक दवाखाने व ३३ आयुर्वेदिक दवाखाने आहेत. अतिशय नाममात्र शुल्कावर ग्रामिण भागातील नागरिकांना हे केंद्र आरोग्याची सुविधा पुरवितात. ग्रामिण भागातील आरोग्य सेवेचा मोठा भार या केंद्रावर आहे. आरोग्य सेवा ही सार्वजनिक सेवा आहेत. केंद्राच्या माध्यमातून कुठलेही व्यवसायिक काम होत नाही. असे असतानाही, महावितरण आरोग्यकेंद्राकडून व्यावसायिक दराने विजेची आकारणी करीत आहे. त्याचा परिणाम म्हणून उपकेंद्राचे वीज बिल महिन्याला ४ ते ५ हजार रुपयांच्या वर येत आहे. तर प्राथमिक वीज केंद्राचे वीज बिल २० ते २५ हजारावर जात आहे. हे वीज बिल भरतांना केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. शिवाय मुख्यालयी राहत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडूनही व्यावसायिक दराने वीज दराची वसूली करण्यात येत आहे. पुर्वी दोन-तीन महिन्याचे वीज बिल थकित राहल्यानंतरही महावितरण वीज कापत नव्हते. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या विजेच्या डिमांड आरोग्य विभागाकडे येत होत्या. तेव्हा आरोग्य विभागाकडून केंद्रासाठी मिळणाऱ्या अनुदानातून वीज बिल भरले जायचे. त्यावेळी विजेचे दरही कमी असल्याने, फारसा भार येत नव्हता. सध्या विजेच्या दरात वाढ झाली आहे. व्यावसायिक वीज दर भरपूर वाढलेले आहे. आता एनआरएचएमकडून केंद्रांना निधी मिळतो.हा निधी रुग्ण कल्याण, आरोग्य सेवा व केंद्राच्या देखभाल दुरूस्तीसाठी येतो. विजेसाठी स्वतंत्र निधी येत नसल्याने, एनआरएचएमचा निधी वीज बिलावर खर्च होत आहे. आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने, केंद्रात वीज नसल्यास, त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होतो. त्यामुळे केंद्राचे आरोग्य अधिकारी तडजोड करून, सर्वप्रथम वीज बिल चुकवितात. महावितरणने आरोग्य केंद्राकडून घरगुती वीज दराची आकारणी करावी, यासाठी जिल्हा परिषद ४ वर्षापासून मागणी करीत आहे. (प्रतिनिधी)