शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अन् जगण्याचे बळ मिळाले

By admin | Updated: November 8, 2015 03:09 IST

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत अडकलेली बच्चेकंपनी मेडिकलच्या कॅन्सर विभागात आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये रमली.

कॅन्सरबाधित मुलांनी साजरी केली ‘दिवाळी’ : मेडिकलच्या कॅन्सर विभागाचा स्तुत्य उपक्रमनागपूर : कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत अडकलेली बच्चेकंपनी मेडिकलच्या कॅन्सर विभागात आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये रमली. या मुलांच्या आयुष्यात सुखाचे चार क्षण पेरताना मेडिकलच्या कॅन्सर विभागाने त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे फुलण्याची संधी दिली. विभागातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्याशी ही मुले खेळताना हळूवार भाविनक नातेही जुळले. खेळणीचे गिफ्ट घेत ‘डॉक्टर काका आपल्याला बरे करतील’, या उमेदीने बच्चे कंपनीला जगण्याचे बळ मिळाले.(प्रतिनिधी)‘राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन’च्या निमित्ताने मेडिकलच्या कॅन्सर विभागाचे डॉ. कृष्णा कांबळे यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडाऊ यांच्या हस्ते झाले. यावेळी समाजसेवक ज्ञानेश्वर रक्षक, विभाग प्रमुख डॉ. अशोक दिवाण आदी उपस्थित होते.आत्मविश्वास निर्माण केलाचिमुकल्या वयात कॅन्सरचे दुखणे सोसत असताना नाउमेद होत असलेले मन, तोच तो औषधांचा दर्प, यातच त्यांचे हरवत चालले बालपण याच जाणिवेतून डॉ. कांबळे यांनी या मुलांना काही वेळांसाठी का होई ना वेगळ्या विश्वात नेले. त्यांच्यासोबत खेळले. खाऊ घातले, लहान मुलांचा चित्रपट दाखविला आणि जगण्याचा आत्मविश्वास निर्माण केला. एकप्रकारे दिवाळीच त्यांच्या सोबत साजरी करण्यात आली. कॅन्सरग्रस्त चिमुकल्यांना दत्तक घ्यावेघरात आधीच दारिद्र्य त्यात चिमुकल्याला जडलेला कॅन्सर. उपचार करण्याची परिस्थिती नसताना ते संघर्ष करीत आहेत, पण दारिद्र्यासमोर अनेकांचे प्रयत्न थिटे पडत आहे. यावर उपाय म्हणून डॉ. कांबळे यांनी उपचारासाठी चिमुकल्यांना दत्तक घेण्याचे आवाहन केले आहे. असे झाल्यास अनेकांना नवजीवन मिळेल. चिमुकल्याला जगविण्याची पालकांची चिंता कमी होईल. अकाली होणारी ही कोवळी पानगळ थांबेल.वेळेत उपचार घ्याडॉ. अशोक दिवाण म्हणाले, रुग्ण म्हणतात कॅन्सरचा उपचार फार महागडा आहे, हा रोग बरा होणारा नाही. रुग्णाचा मृत्यूच होतो. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. जर वेळेत कॅन्सरचा उपचार केल्यास, स्वस्तात उपचार होतो आणि महत्त्वाचे म्हणजे रुग्ण बरा होतो. गरज आहे फक्त या रोगाच्या संदर्भात सतर्कता पाळण्याची. त्याच्या लक्षणाच्या माहिती असण्याची. यावेळी त्यांनी कॅन्सरची लक्षणे, उपचार व उपाययोजनांची माहिती दिली.संवेदनशीलता पुढे आलीमेडिकलच्या कॅन्सर विभागात उपचार घेणाऱ्यांमध्ये गरीब व मध्यमवर्गीय मुलांची संख्या मोठी आहे. मेडिकल प्रशासन आपल्याकडून या मुलांना जेवढी मदत करता येईल, तेवढी करीत आहे, परंतु अनेक ठिकाणी त्यांची ही मदतही दुबळी पडत असल्याने, विभागाने शहरातील प्रतिष्ठित संस्था आणि दानदात्यांना आवाहन केले होते. त्यानुसार काहींनी मदत केली. ही मदत त्यांना लागणारी औषध, खेळणी, भेट वस्तू, खाद्य पदार्थांची होती. समाजाची ही संवेदनशीलता पाहून या भयंकर आजाराने नाउमेद झालेल्यांना जगण्याचे बळ मिळाले.