शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जलसंकट निसर्गनिर्मित नव्हे तर मानवनिर्मित

By admin | Updated: May 24, 2016 02:47 IST

देशातील अनेक राज्यात सध्या जलसंकट निर्माण झाले असून, पाण्याचे संकट हे निसर्गनिर्मित नसून..

गिरीश गांधी : रोहणा येथे ७० गॅबियन बंधाऱ्यांच्या कामाला प्रारंभकाटोल : देशातील अनेक राज्यात सध्या जलसंकट निर्माण झाले असून, पाण्याचे संकट हे निसर्गनिर्मित नसून ते सुल्तानी संकट असल्याचे प्रतिपादन वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी केले. नरखेड तालुक्यातील रोहणा येथे ७० गॅबियन बंधाऱ्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ. आशिष देशमुख, रूपाताई देशमुख, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, चरणसिंग ठाकूर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती उकेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे, पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे, नरखेड पंचायत समितीचे सभापती राजू हरणे, सुरेश आरघोडे, डॉ. प्रेरणा बारोकर, बबन लोहे, सुरेश खसारे, संध्या मानकर, रमेश फिस्के, इस्माईल बारुदवाले, मारोतराव बोरकर, दिलीप तिजारे, बालू ठाकूर, चंद्रशेखर देशमुख, प्रा. भाऊ भोगे यांची उपस्थिती होती.गिरीश गांधी पुढे म्हणाले, चांगल्या पर्यावरणासाठी ३३ टक्के जमीन ही जंगलव्याप्त असायला पाहिजे. भारतात ७५ दशलक्ष हेक्टरवर घनदाट जंगल होते, जे ११० दशलक्ष हेक्टर असायला पाहिजे होते. मात्र त्यामध्ये ६० वर्षांत वाढ झाली नाही. जमिनीची धूप थांबविणे महत्त्वाचे असून पाणी कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही, हे देखील विसरता कामा नये, असे विचार मांडले.आ.डॉ. आशिष देशमुख यांनी दरवर्षी पाण्याचा प्रश्न बिकट होत असून, महाराष्ट्रातील ३३ हजार गावांत दुष्काळ जाहीर करावा लागला. त्यामुळे आता प्रत्येक गावाला जलनीती तयार करून पाण्याचे आॅडिट करावे लागेल व गावाला किती पाणी लागेल याची माहिती करावी लागेल, असे स्पष्ट केले. माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त काटोल व नरखेड या दोन्ही तालुक्यात ७० गॅबियन बंधारे तयार करण्याचा संकल्प करण्यात आला होता. परंतु उपविभागीय अधिकारी कातडे यांनी गावातील कर्मचारी व गावकरी यांच्या माध्यमातून ३५० व चरणसिंग ठाकूर यांनी ५० बंधारे बांधून देण्याचा संकल्प केल्याने ५०० बंधारे जुलै महिन्यापूर्वी पूर्ण करण्याचे आ.डॉ. आशिष देशमुख यांनी जाहीर केले. प्रास्ताविक दिनकर राऊत यांनी केले. संचालन प्राचार्य डॉ. विजय धोटे यांनी तर आभार उकेश चव्हाण यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)