शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईत पाणी महाग!

By admin | Updated: June 8, 2016 02:19 IST

शहरालगतच्या भागाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. या भागात तीव्र पाणीटंचाई आहे. बहुसंख्य

नागपूर : शहरालगतच्या भागाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. या भागात तीव्र पाणीटंचाई आहे. बहुसंख्य वस्त्यांत नळाचे नेटवर्क नाही. टँकरनेही नियमित पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही पाणीपट्टीत ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. १ मार्च २००९ च्या शासनाच्या निर्णयानुसार नागपूर शहरातील पाणीपट्टी व दर मूल्यांकनाचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. त्यानुसार पाणीपट्टीत दरवर्षी वाढ केली जाते. २०१६ या वर्षासाठी १ एप्रिलपासून पाणीपट्टीत ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु शहरालगतच्या भागात नळाचे नेटवर्क नसलेल्या भागाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. टंचाईग्रस्त भागाला टँकरद्वारे पाणी उपलब्ध करणे अपेक्षित आहे. परंतु काही वस्त्यांना दिवसाआड तर काही भागात दोन दिवसातून एकदा पाणी मिळते. उन्हाळ्याच्या दिवसात विहिरी आटल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागते. परंतु मागणी करूनही वेळेवर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. महापालिके त समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर, नरसाळा तसेच बेसा, बेलतरोडी, भरतवाडा, पुनापूर, पारडी, हिवरीनगर, रमना मारोती, ताजबाग, दिघोरी, मानेवाडा, जोगीनगर, भांडेवाडी, वाठोडा, नारा, नारी, झिंगाबाई टाकळीचा काही भाग, गोरेवाडा आदी भागातील अनेक वस्त्यांत पाणीटंचाई आहे. नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. असे असतानाही पाणी दरवाढ शहरातील सर्व भागाला सरसकट लागू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)शहरातील १९०० व ५७२ लेआऊ टमधील नागरिकांना नासुप्रकडे विकास शुल्क जमा केले आहे. काही भागातील नागरिकांनी १५ ते २० वर्षांपूर्वी विकास शुल्क जमा केले असतानाही अद्याप या भागात नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अनधिकृत वस्त्या असल्याने महापालिकेलाही या भागात विकास कामे करता आलेली नाही. वस्त्या नियमित करण्यात आल्यानंतरही या भागातील लोकप्रतिनिधींचा प्रामुख्याने रस्त्यांच्या कामावर जोर असून आवश्यक मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष असल्याने पाणीटंचाईला लोकांना सामोरे जावे लागत आहे.