शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

भाजप नगरसेवकाला ‘पाणी बाधा’ !

By admin | Updated: May 2, 2015 02:20 IST

‘२४ बाय ७’ पाणीपुरवठा योजना राबवून शहरातील नागरिकांना २४ तास शुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा नागपूर महानगरपालिकेतर्फे केला जातो.

नागपूर : ‘२४ बाय ७’ पाणीपुरवठा योजना राबवून शहरातील नागरिकांना २४ तास शुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा नागपूर महानगरपालिकेतर्फे केला जातो. या योजनेबाबत देशभरात मोठा गवगवा करून स्वत:चीच पाठ थोपटून घेतली जाते. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. नागरिकांना तर दूरच राहिले परंतु सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना सुद्धा शुद्ध पाणी मिळत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सत्ताधारी भाजपाचे नगरसेवकच दूषित पिण्याच्या पाण्यामुळे आजारी पडले आहे. उलटी आणि हगवणीमुळे ते त्रस्त झाले असून यासाठी ते अधिकाऱ्यांना दोषी ठरवित आहेत. दूषित पिण्याच्या पाण्यामुळे आजारी पडलेले ते नगरसेवक म्हणजे प्रदीप पोहाणे होत. पोहाणे हे भारतनगर प्रभागातील भाजपाचे नगरसेवक असून ते लकडगंज झोनचे सभापतीसुद्धा राहिले आहेत. जुना पारडी नाका येथील तिखिले हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत आहेत. लोकमतने त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी आपल्या आजारासाठी अधिकाऱ्यांना दोषी ठरविले असून आजारातून बरा होताच अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. शहरात सध्या प्रचंड उन्हात भीषम जलसंकट निर्माण झाले आहे. भारतनगर प्रभागही प्रभावित आहे. भारतनगरसह कळमना, पारडी आदी भागातही दूषित पाणी पुरवठा होत आहे.