शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

‘सीओसी’ मदतीने पावसाळी परिस्थितीवर ‘वॉच’()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:07 IST

पालकमंत्र्यांनी केली पाहणी : नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय हवामान विभागाने गुरुवारी पावसाचा इशारा ...

पालकमंत्र्यांनी केली पाहणी : नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारतीय हवामान विभागाने गुरुवारी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार पावसाने नागपुरात दमदार हजेरी लावली. अनेक चौकात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने विविध चौकात साचलेले पाणी काढले. या कामात त्यांना नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत झाली. मनपा अधिकाऱ्यांनी श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर (सीओसी) मधून शहराचा आढावा घेत कर्मचाऱ्यांना पाठवून पाण्याचा निचरा करण्यास मदत केली.

पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी गुरुवारी सिटी ऑपरेशन सेंटरला भेट देऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. मनपाच्या आरोग्य विभागाने सार्वजनिक आरोग्य व अभियांत्रिकी विभाग व अग्निशमन विभागाचे अधिकारी सीओसीच्या माध्यमातून नागपूरातील विविध चौकात साचलेल्या पाण्याचा आढावा घेतला. झोन कर्मचाऱ्यांच्या माध्यमाने पाण्याचा निचरा करण्याचे काम करतात अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.

शहरात ३६०० कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याचे ‘लाईव्ह फुटेज’ सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये लावण्यात आलेल्या व्हिडियो वाॅल वर दिसतात. त्यानुसार यंत्रणेने मेडिकल चौक, शंकरनगर चौक, इंडियन कॉफी हाऊस चौक सदर, जगनाडे चौक, पडोळे चौक व इतर ठिकाणी साचलेल्या पाण्याबाबत झोनच्या टीम ला सांगून रस्ता वाहतुकी योग्य केला.

यावेळी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, स्मार्ट ‍सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, नगरसेवक किशोर जिचकार, जुल्फीकार भुट्टो, पुरुषोत्तम हजारे, नगरसेविका नेहा निकोसे, माजी नगरसेवक मनोज सांगोळे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार,मुख्य अग्निशमन अधिकारी राजेन्द्र उचके, स्वच्छता विभागाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, स्मार्ट सिटीचे महाप्रबंधक डॉ. शील घुले, अनुप लाहोटी, आरती चौधरी उपस्थित होते.

....

या क्रमांकावर करा तक्रार

आपल्या परिसरात पाणी साचल्यास मनपाच्या आपात्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी ०७१२-२५६७०२९, २५६७७७७ आणि अग्निशमन विभागाच्या ०७१२-२५४०२९९, ०७१२-२५४०१८८, १०१, १०८, ७०३०९७२२०० या क्रमांकांवर संपर्क साधावा.असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.