शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मित्रानेच केला होता पाजीचा खून ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:11 IST

नागपूर : गर्लफ्रेंडसोबत जवळीक साधत असल्याची शंका आल्यामुळे अमनदीप सिंह राजपूत ऊर्फ पाजीचा त्याच्या मित्रानेच खून केल्याचे उघडकीस आले ...

नागपूर : गर्लफ्रेंडसोबत जवळीक साधत असल्याची शंका आल्यामुळे अमनदीप सिंह राजपूत ऊर्फ पाजीचा त्याच्या मित्रानेच खून केल्याचे उघडकीस आले आहे. कपिलनगर पोलिसांनी म्हाडा क्वाॅर्टर येथील रहिवासी आरोपी सम्यक बागडे यास अटक केली आहे.

मंगळवारी रात्री २५ वर्षांच्या अमनदीप राजपूतचा म्हाडा क्वॉर्टरमध्ये सम्यक बागडेने खून केला होता. खून केल्यानंतर सम्यक फरार झाला होता. बुधवारी सकाळी त्याला अटक केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. अमनदीप क्लिनरचे काम करीत होता. त्याची सम्यकसोबत जुनी मैत्री आहे. सम्यक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांसोबत राहतो. एक १९ वर्षांची युवती त्याची गर्लफ्रेंड होती. सहा महिन्यापूर्वी सम्यकचा गर्लफ्रेंडसोबत ब्रेक अप झाला. सम्यकने अमनदीपला भेटण्यासाठी त्याच्या घरी येत होता. त्याला सम्यकच्या गर्लफ्रेंडबाबत माहिती होती. अमनदीपने आपल्या गर्लफ्रेंडसोबत मैत्री केल्याची सम्यकला शंका होती. त्यामुळे तो संतप्त झाला होता. त्याने अमनदीपला धडा शिकविण्याचे ठरविले. त्याने मंगळवारी रात्री नऊ वाजता अमनदीपला आपल्या घरी बोलावले. कामावरून परतल्यानंतर अमनदीप सम्यकच्या घरी पोहोचला. त्याला सम्यक आपल्यावर संतप्त असल्याची माहिती नव्हती. अमनदीप येताच सम्यकने त्याच्याशी वाद घातला. अमनदीप बाईकवरून घरी जात होता. त्याला रोखण्यासाठी सम्यकही बाईकवर स्वार झाला. त्याने मागून अमनदीपच्या गळ्यावर वार केला. जखमी झाल्यामुळे अमनदीपने बाईक थांबविली. त्यानंतर सम्यकने अमनदीपच्या चेहऱ्यावर चाकूने वार करून त्याचा खून केला.

........

सहा दिवसात दोन खून

सहा दिवसात म्हाडा क्वाॅर्टरमध्ये मुलीच्या वादातून खून होण्यााची ही दुसरी घटना आहे. १८ ऑगस्टला म्हाडा कॉलनीत एकतर्फी प्रेमातून बहिणीला त्रास देत असल्यामुळे संतप्त युवकांनी साथीदाराच्या मदतीने कमलेश सहारे या युवकाचा खून केला होता. आरोपींनी कमलेशला वस्तीत न येण्याची सूचना दिली होती. परंतु त्याकडे कमलेशने दुर्लक्ष केल्यामुळे त्याला जीव गमवावा लागला.

.........