शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून विद्यार्थी पदवीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 28, 2015 01:50 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’तर्फे (नॅशनल असेसमेंट अ‍ॅ़न्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल)

नागपूर विद्यापीठ : हाच आहे का ‘अ’ दर्जा ? नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’तर्फे (नॅशनल असेसमेंट अ‍ॅ़न्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल) ‘अ’ दर्जा देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात अद्यापही भोंगळ कारभारच सुरू असल्याची बाब समोर आली आहे. विद्यापीठाने २०१२ सालापासून विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र दिलेच नसून यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या सगळ्याची माहिती असूनदेखील विद्यापीठाने कुठलीही तातडीची पावले उचलण्याचे कष्ट घेतले नाही. शुक्रवारी झालेल्या विद्यापीठाच्या विधीसभेच्या बैठकीत अ‍ॅड. मनमोहन बाजपेयी यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ होऊन महिना उलटून गेला असतानादेखील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र का मिळाले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पदवी प्रमाणपत्र नसल्याने अनेकांच्या नोकरी संकटात आल्या आहेत. विशेषत: विदेशातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या ठिकाणी पदवी प्रमाणपत्राची मागणी होती. दीक्षांत समारंभ झाल्यावरदेखील पदवी कशी मिळत नाही अशा प्रश्न उपस्थित करुन विद्यार्थ्यांवरच संशय घेण्यात येतो, असे बाजपेयी म्हणाले. यावर चर्चा सुरू असताना २०१३ सोबतच २०१२ च्या विद्यार्थ्यांना म्हणजेच १०० व्या दीक्षांत समारंभातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांच्या हाती पदवी प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे प्रशासनाने मान्य केले. २०१२ साली उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांचे काम पूर्ण झाले असून त्यांचे वितरण करण्यात येईल अशी माहिती प्रभारी परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते यांनी दिली. (प्रतिनिधी)विद्यापीठ घेणार निवृत्त अधिकाऱ्यांची सेवाविद्यापीठात कर्मचारी व अधिकाऱ्यांची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे पदवी प्रमाणपत्रांच्या कामाला फटका बसतो. ही बाब लक्षात घेऊन निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रतिदिवस मानधन तत्त्वावर सेवा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. यानुसार १२ जणांची नियुक्ती झाल्याची माहिती देण्यात आली.आकड्यांबाबतदेखील घोळविद्यापीठाने दिलेल्या छापील उत्तरात २०१३ च्या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी देण्यात आली आहे. १०१ व्या दीक्षांत समारंभात ६८ हजार ७७१ विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात आली असून त्यापैकी आचार्य पदवीच्या केवळ १६६ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु पुढील उत्तरात हाच आकडा ६८ हजार ६०५ इतका सांगण्यात आला. त्यामुळे नेमका आकडा किती यावरुन अ‍ॅड.बाजपेयी यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.