शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यासह २९ जिल्हा परिषदांना मुदतवाढीची प्रतीक्षा

By admin | Updated: August 13, 2014 23:36 IST

२९ जिप अध्यक्षांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपत आहे.आचारसंहितेमुळे मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

बुलडाणा : राज्यातील २९ जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर या काळात आचारसंहिता राहण्याची शक्यता असल्याने, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळही आचारसंहितेच्या काळात, म्हणजेच सप्टेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेणे शक्य होणार नाही. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया या सहा जिल्हा परिषदा वगळल्या तर राज्यातील उर्वरित सर्व जिल्हा परिषदांमध्ये ही अडचण उभी ठाकली आहे. २00५ आणि २00९ च्या विधानसभा निवडणुकीत अशीच अडचण आली होती. त्यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्षांना मुदतवाढ देण्यात आली होती. यावेळीही अशी मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्य शासनाने मुदतवाढीचा निर्णय घेतला नाही तर २0 सप्टेंबर पूर्वी अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडणुका बुलडाण्यात घ्याव्या लागणार असून, विधानसभेसोबतच जिल्हा परिषदेचेही राजकारण चांगलेच तापणार आहे. * आज शेवटची सर्वसाधारणसभाजिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यकाळाची मुदत २0 सप्टेंबर रोजी संपत असून, अध्यक्षांना मुदतवाढ न मिळाल्यास आज होणारी सर्वसाधारण सभा ही विद्यमान पदाधिकार्‍यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा ठरू शकते. जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात आज अध्यक्ष वर्षा वनारे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले असून, विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर ही सभा होत आहे. विशेष म्हणजे आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जलसंधारण कामांचे लोकार्पण होत असून, स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचीही गडबड प्रशासकीय वतरुळात आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकेल, या शक्यतेमुळे ही सर्वसाधारण सभा स्वातंत्र्यदिनापूर्वी घेण्यात आली असून उपाध्यक्ष व पदाधिकार्‍यांना आपल्या मतदारसंघातील विविध कामे मार्गी लावण्याची घाई करावी लागणार आहे.