शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वाडीत अपघात; पोलिसांकडे नोंदच नाही

By admin | Updated: August 13, 2016 02:25 IST

नागपूर-अमरावती महामार्गावर कंट्रोलवाडी परिसरात गुरुवारी रात्री ९.४५ च्या सुमारास सुसाट दुचाकीस्वाराने ...

पादचारी गंभीर जखमी : दुचाकीस्वार फरार, स्थानिकांनीच जखमीला हॉस्पिटलमध्ये हलविले नागपूर : नागपूर-अमरावती महामार्गावर कंट्रोलवाडी परिसरात गुरुवारी रात्री ९.४५ च्या सुमारास सुसाट दुचाकीस्वाराने पायी जाणाऱ्यास जबर धडक दिली. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याला १०८ क्रमांकाच्या अ‍ॅम्बुलन्सने हॉस्पिटलमध्येही भरती केले. मात्र असे असताना वाडी पोलीस म्हणतात, की अपघातच घडला नाही. त्यामुळे हा अपघात लपविण्यामागील वाडी पोलिसांचा उद्देश काय, ते समजू शकले नाही. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडी नाक्यापासून अवघ्या काही अंतरावर कंट्रोलवाडी येथे गुरुवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. एक तरुण सुसाट बाईकने वाडी नाक्याकडून दत्तवाडीकडे जात होता. त्याच्या मागे तरुणी बसली होती. दरम्यान, कंट्रोलवाडी येथे रस्ता पार करीत असताना एका व्यक्तीला या दुचाकीने जबर धडक दिली. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला. तर दुचाकीवरून तरुण आणि तरुणी दोघेही पडले. अपघात झाल्याचे लक्षात येताच एका मिनिटांच्या आत ये-जा करणाऱ्यांसह परिसरातील नागरिक तेथे आले. त्यांनी जखमी व्यक्तीला बाजूला केले. सोबतच तरुणाला पळून जाऊ नको, असे बजावले. मात्र त्याने तेथून पळ काढला. त्यामुळे तेथे असलेल्या प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्याच्या मोटरसायकलचा क्रमांक नोंदवून ठेवला. या अपघाताबाबत लगेच कंट्रोल रुम आणि वाडी पोलिसांना सूचना दिली. तसेच अ‍ॅम्बुलन्ससाठीही फोन केला. हा आरोपी तरुण पळून जाताच त्याच्या मोटरसायकलचा क्रमांकसुद्धा वाडी पोलिसांना अपघात घडताच अवघ्या पाच मिनिटांमध्ये सांगण्यात आला. अपघाताची माहिती मिळताच अ‍ॅम्बुलन्स आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी वेळ वाया न घालविता गंभीर जखमीला लगेच हॉस्पिटलमध्ये हलविले. या अपघातानंतर वाडी पोलीस १०.१० च्या सुमारास घटनास्थळाकडे रवाना झाले. एवढी तत्परता (विलंब) वाडी पोलिसांनी दाखविली. विशेष बाब म्हणजे, शुक्रवारी सकाळपर्यंत या अपघाताची नोंदच वाडी पोलीस ठाण्यात नव्हती. दुसरीकडे, अपघात होऊनही वाडी पोलीस या अपघाताची माहिती लपविण्याच्या कामी लागले. त्यानंतर मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न चालविला. (जिल्हा प्रतिनिधी) ठाणेदार म्हणतात... या अपघाताबाबत वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. खंदाळे यांना विचारणा केली असता, ‘कंट्रोलवाडी येथे झालेला अपघात प्रत्यक्षात अपघात नव्हता. ती व्यक्ती दारु पिऊन होती’ असे सुरुवातीला सांगितले. नंतर त्यांनीच कॉलबॅक करून ‘अपघात झालाही असेल. मात्र आमचे सहकारी स्पॉटवर गेले तोपर्यंत सर्व निवळले होते. जखमीला ज्या हॉस्पिटलमध्ये भरती केले, त्या हॉस्पिटलवाल्यांनी किमान आम्हाला कळविणे गरजेचे होते. परंतु त्यांनीही तसे औदार्य दाखविले नाही’ अशी खंत व्यक्त केली.