लाल दरियानी यांनी आभार व्यक्त करताना सुरेशदादा जैन व विजय दर्डा यांचे या वेबिनारमध्ये भाग घेतल्याबद्दल विशेष आभार मानले. वेबिनारमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांनी सहभाग नोंदवून आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. लहान मुलांसाठी प्रक्षेपित होणाऱ्या टीव्ही कार्यक्रमाचे अँकर एचकेजी हॅरी वाँग म्हणाले, ‘भारत ही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांची भूमी आहे.’ आनंदी राहण्याबद्दल बाेलताना त्यांनी आपल्या मुलाची गाेष्ट सांगितली. ‘४ वर्षांचा असताना मी त्याला हॅपिनेसबद्दल शिकविले. एक दिवस तो जवळ आला आणि म्हणाला, डॅडी तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे आणि ती मिळाली नाही, तरीही तुम्ही आनंदी असता, हेच हॅपिनेस आहे.’
युनिक यू करिअर-ब्रुसेल्सच्या संचालक अलिशा अली म्हणाल्या, ‘मी वेगवेगळ्या व्यासपीठावरून बोलते तेव्हा असा अनुभव येतो की, पूर्वेकडील संस्कृतीची जास्तीत जास्त वाटचाल ही पश्चिमेकडे होत आहे. माझे ध्येय लोकांच्या समग्र जीवनाचे आकलन करणे आहे.’ डॉ. संजय म्हणाले, ‘मी आणि माझी पत्नी एका साच्यात बंदिस्त राहण्यावर विश्वास ठेवत नाही. मी दररोज ४ तास काम करतो. आम्ही आमच्या पॅशनसाठी अभ्यास करतो.’ बुद्धिमत्तेबद्दल बोलताना म्हणाले, सर्वाेच्च पदावर असलेलाच व्यक्ती बुद्धिमान असेल असे गरजेचे नाही. ते कुशल असल्यामुळे कदाचित यशस्वी हाेत असतात. बुद्धिमान व्यक्ती हा आनंदी असतो. कारण पैसा, नोकरी, प्रतिष्ठेच्या मागे लागण्यापेक्षा ते आपल्या आवडीनिवडी जपतात. नेवाडा मार्गाने आपले जीवन जगा, असा संदेश डाॅ. संजय यांनी दिला.
(तुम्ही नेवाडा वेलनेसच्या फेसबुक पेजवर सर्व १२ विशेष माहितीपर सेमिनार बघू शकता.)