नेवादा हे हाॅंगकाॅंगमधील पहिले एकिकृत आराेग्य केंद्र आहे जे आराेग्यविषयक ‘मेड इन इंडिया’ प्राेडक्ट आणि सेवा पुरविते, ज्यामध्ये प्राचीन वैदिक हिंदू मंत्र आणि वैज्ञानिक नॅचराेपॅथीचा समावेश आहे. हिंदू वैदिक आयुष्य जगण्याचा मंत्र प्राचीन भारताच्या चार वेदांतून घेतला आहे. नेवादाचा संदेश प्रेरणादायी आणि संवादात्मक सेमीनारच्या माध्यमातून दिला जात आहे. नेवादाकडून आराेग्य व निराेगीपणाची माहिती देणारे सल्लागार पुरविताे. ॲलाेपेसिया/केसगळतीचे उपचार आणि उपाय, उच्च गुणवत्तेचे सेंद्रिय राेगनिवारक सप्लीमेंट्स आणि हेल्थ स्पायसेसचा पुरवठा करताे. या प्राेडक्टसना आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व अन्न सुरक्षेचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
नेवादा ही सेंद्रिय, नैसर्गिक व रसायनमुक्त वस्तुंचे निर्माते, वितरक आणि रिटेलर्स संस्था आहे. यामध्ये हेअर कलर, शाम्पू, केसगळतीची हर्बल थेरेपी, व्हाेलफूड स्पिरुलिना, उपयाेगी औषधी वनस्पती, मसाले आणि पाेषण सप्लीमेंट्सचा समावेश आहे. नेवादाच्या टीममध्ये जागतिक दर्जाचे वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ, उद्याेजक, ग्रीन आणि पर्यावरण अँबेसेडर, तसेच नॅचराेपॅथी व आयुर्वेदमध्ये विशेषतज्ज्ञ असलेल्या केस, याेग आणि पाेषण सल्लागाराचा समावेश आहे.