शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विजयोत्सव

By admin | Updated: June 13, 2017 01:59 IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

शासनाचे अभिनंदन : अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशाराही लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. नागपुरातही सोमवारी शेतकरी संघटना, जय जवान जय किसान संघटनेतर्फे विजयोत्सव साजरा करण्यात आला. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याजवळ लक्ष्मीभुवन चौक धरमपेठ येथे सोमवारी सकाळी फटाके फोडून व मिठाई वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला. तसेच सरकारने सरसकट कर्जमाफी केल्यामुळे शासनाचे, मुख्यमंत्र्यांचे व सर्व मंत्र्यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. दोन दिवसात थकीत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा न झाल्यास आंदोलन तीव्र करणार असा इशाराही देण्यात आला. यावेळी अरुण वनकर, किशोर चोपडे, शरद खेडीकर, विजयकुमार शिंदे, सतीश इटकेलवार, रवी इटकेलवार, अविनाश गोतमारे, जयंत घोडमरे, मिलिंद महादेवकर, मंगेश पात्रीकर, ऋषिकेश जाधवसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. दुसरीकडे शेतकरी संघटनेतर्फे गिरीपेठ येथील संघटनेच्या कार्यालयासमोर फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शेतकरी कर्जमुक्ती ही शेतकरी आंदोलनाचे यश असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी छोटेखानी बैठकही घेण्यात आली. यात राम नेवले यांच्यासह अरविंद देशमुख, अरुण केदार, श्याम वाघ, अ‍ॅड. नंदा पराते, मदन कामडे, सतीश दाणी, जयंतराव चितळे, राम घोडे, डॉ. मीनाक्षी वाढबुद्धे, भय्याजी माकोडे, माया चवरे, डॉ. पुरुषोत्तम भोंडे, दिलीप घोरमारे, प्रभाकर काळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.